सिन्नरला म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याचे संकेत

सिन्नरला म्हाडाचा गृहनिर्माण प्रकल्प साकारण्याचे संकेत

नांदूरशिंगोटे । भानुदास वैष्णव Nandurshingote

सिन्नर तालुक्यातील Sinnar Taluka मुसळगाव औद्योगिक वसाहतीच्या Musalgaon MIDC पुढे शिर्डी महामार्गावर साकारत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाजवळील सहा हेक्टर जागेवर म्हाडाचा गृहनिर्माण MHADA Housing Project प्रकल्प साकारण्याचे संकेत राज्याचे गृहनिर्माणमंत्री तथा सिन्नरचे भूमिपुत्र डॉ. जितेंद्र आव्हाड Minister of State for Housing Jitendra Avhadयांनी दिले आहेत.

आव्हाड यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत हा निर्णय झाल्याची माहिती संघर्ष ग्रुपचे तालुकाध्यक्ष संदीप शेळके व राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस राजाराम मुरकुटे यांनी ‘देशदूत’ला दिली.

आशिया खंडातील सर्वात मोठी सहकारी औद्योगिक वसाहत म्हणून जगाच्या नकाशावर सिन्नरचे नाव अग्रभागी झळकत आहे. विविध उत्पादनांच्या शेकडो कंपन्या व त्यात काम करणारे हजारो कुशल व अकुशल कामगार येथे कार्यरत आहेत. या सर्वांचा राहण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला असून अनेक कामगार अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत जीवन कंठीत आहेत. वाढती महागाई, तोकडे उत्पन्न अशी तारेवरची कसरत करून कुटंबाचा उदरनिर्वाह चालू आहे.

या सर्वांचे घरकुलाचे स्वप्न साकार व्हावे व परवडेल अशा स्वरुपात या वसाहतीच्या संकल्पनेची मागणी करण्यात येत होती. या सर्व बाबींचा विचार करून या वसाहतीस या बैठकीत हिरवा कंदिल दाखवण्यात आला व तसे आदेश संबंधित विभागाला देण्यात आल्याचे शेळके व मुरकुटे यांनी सांगितले.

शिर्डी महामार्गावरील मुसळगाव औद्योगिक वसाहतीजवळ साकारत असलेल्या तालुका क्रीडा संकुलाजवळील सुमारे सहा हेक्टर जागेवर हा गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस नाशिक गृहनिर्माणचे मुख्याधिकारी दीपक कासार, प्रांताधिकारी पूजा गायकवाड, तहसीलदार राहुल कोताडे, सिन्नर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार, बाळकृष्ण केदार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com