
नाशिक । प्रतिनिधी Old Nashik
राजकीयदृष्टया अत्यंत हॉट समजल्या जाणार्या जुने नाशिक परिसरातील दिग्गज नगरसेवकांना महापालिकेच्या नव्या आरक्षणात विशेष असा धक्का लागलेला दिसत नाही.मात्र प्रभाग रचना बदलण्यात आल्यामुळे काही नगरसेवकांना इतर ठिकाणी जाऊन आपले नशीब आजमावे लागणार आहे. तर काही खुल्या जागांवर महिला आरक्षण आल्यामुळे महिला उमेदवार द्यावे लागणार आहे. यामध्ये दुबई म्हणून प्रसिद्ध प्रभाग 20 सध्या चांगला चर्चेत आहे.
शहरातील मध्य नाशिक म्हणजेच महापालिकेच्या भाषेत पूर्व विभागमध्ये प्रभाग क्रमांंक 17, 18, 19, 28, 40 यामध्ये रंगतदार लढती होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक 28 मधून माजी महापौर सतीश कुलकर्णी यांच्या कन्या संध्या कुलकर्णी व माजी नगरसेवक यशवंत निकुळे, मुजम्मील मिर्झा इच्छुक आहेत. त्याचप्रमाणे येथे समाजवादी पक्षाचे इमरान चौधरी आदींची नावे देखील चर्चेत आहे.
प्रभाग 17 हा माजी महापौर तथा माजी आमदार वसंत गिते यांचा बालेकिल्ला मानला जातो. या ठिकाणी अपेक्षेप्रमाणे आरक्षण पडल्यामुळे विद्यमानांमध्ये समाधान दिसत आहे. या प्रभागांमध्ये सुमारे 10 हजार मुस्लिम समाजाचे मतदान असल्यामुळे उमेदवारांची गर्दी वाढणार आहे.
यामध्ये माजी नगरसेवक मुशिर सय्यद, गुलजार कोकणी, अलीम शेख, अक्रम खतीब, औसाफ हाशमी आदींची नावे चर्चेत आहे. प्रभात 17 आणि 18 मध्ये देखील दिग्गज मैदानात करण्यासाठी तयार आहे.
यामध्ये माजी महापौर विनायक पांडे यांचे चिरंजीव ऋतुराज पांडे, माजी नगरसेवक शाहू खैरे, काँग्रेस माजी नगरसेवक संजय चव्हाण, माजी महापौर यतीन वाघ, नैय्या खैरे, हरिभाऊ लोणारी, माजी नगरसेविका माधुरी जाधव, वत्सला खैरे आदी नावे चर्चेत आहे. दुबई प्रभाग म्हणून प्रसिद्ध व सध्याचा प्रभाग क्रमांक 20 हा देखील दिग्गजांच्या लढाईमध्ये चर्चेत राहणार आहे.
या प्रभागात एक एससी तसेच एक महिला ओबीसी व एक जागा खुले महिलांसाठी राखीव झाल्यामुळे खुल्या जागेतून महिला उमेदवार उतरावे लागणार आहे. यामुळे यंदा जुने नाशिकची लढाई रंगतदार होणार आहे.