शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल

शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल
ऑनलाईन शिक्षण

नाशिक | वैशाली सोनार-शहाणे | Nashik

सक्तीच्या टाळेबंदीने (Lockdown) शिक्षण (Education) क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवला. शाळा (School) बंद असूनही मुलांचे शिकणे सुरू ठेवण्यासाठी टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात प्रयोगशील शाळांनी अभिनव प्रयोग केले...

नाशिकच्या आनंद निकेतन (Anand Niketan) या शाळेने मुलांना घरच्या घरी करता येतील असे अनेक उपक्रम राबवले. त्या उपक्रमांच्या माध्यमातून पारंपरिक अभ्यासातील कौशल्यांचा विकास करण्याचा प्रयत्न केला.

पुण्याची सृजन आनंद, कोल्हापुरची लीलाताई पाटील यांची शाळा अशा काही शाळांनी समाज माध्यमांचा उपयोग करून पालकांच्या जाणिवा वाढवल्या. पण अशा प्रयोगांना काही मर्यादा होत्या. त्यामुळे व्यापक स्तरावर सरकारने ऑनलाईन (Online) पद्धत स्वीकारली.

परिणामी मुलांची ऑनलाईन शाळा (Online Education) सुरू राहिली. परीक्षाही ऑनलाईनच घेतल्या गेल्या. तथापि ऑनलाईन शिकण्यासाठीच्या साधनांची अनुपलब्धता ही मोठीच समस्या ठरली. या पद्धतीने मुलांचे शिकणे होते का? समाजातील किती टक्के मुलांपर्यंत ऑनलाईन शिक्षण पोहोचले नाही, यावर अनेक संस्थांनी सर्वेक्षणे (Survey) केली.

त्याचे निष्कर्ष फारसे आशादायी नव्हते. राज्यातील फक्त 72 टक्के शाळांमध्येच संगणक (Computer) आणि त्यापैकी 36 टक्के शाळांमध्येच इंटरनेट जोडणी आहे. ही शासनाचीच आकडेवारी आहे. त्याप्रमाणात मुलांचे ऑनलाईन शिकणे प्रभावी झालेले नाही.

तरीही यामुळे शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये काही नवी कौशल्ये विकसित झाली ही त्याचीच उपलब्धी. दोन वर्षांच्या कालखंडानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत. दोन वर्षे मुले शाळेत जाऊ शकली नव्हती त्याचे फायदे आणि तोटे यावर आता अभ्यास सुरू झाला आहे.

Related Stories

No stories found.