साईडपट्ट्या बनल्या घातक; दुचाकीधारकांच्या अपघाताला बनतेय कारण

साईडपट्ट्या बनल्या घातक; दुचाकीधारकांच्या अपघाताला बनतेय कारण

सिन्नर | प्रतिनिधी | sinnar

सिन्नर-घोटी महामार्गावर (Sinnar-Ghoti highway) दिवसेंदिवस वाहतूक वाढत असताना हा महामार्ग पादचाऱ्यांसाठी असुरक्षित बनत चालला आहे.

काही वर्षांपूर्वी सिन्नर-घोटी महामार्गाचे नव्याने डांबरीकरण झाले, त्यावेळी बऱ्यापैकी साईडपट्ट्याही (Side bars) तयार करण्यात आल्या होत्या. मात्र, यंदा तालुक्यासह जिल्हाभरात अतिवृष्टी (heavy rain) झाल्यामुळे शेतीसह रस्त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. महामार्गाच्या कडेला असलेल्या मुरुमच्या साईडपट्ट्याही पाण्यात वाहून गेल्याचे चित्र आहे.

साईडपट्ट्या खचून गेल्याने जागोजागी खोल खड्डे (potholes) पडले आहेत. अशा परिस्थितीत समोरून मोठे वाहन आल्यास दुचाकीधारकास आपले वाहन रस्त्याच्या खाली घेणे अवघड होते. रात्रीच्यावेळी या खचलेल्या साईडपट्ट्या दिसून येत नसल्याने महामार्गावर अपघाताचे (accidents) प्रमाण वाढले आहे. यामुळे अनेकांना गंभीर इजा तर काहींना आपले प्राणही गमवावे लागत आहेत. रात्रीच्यावेळी भरधाव चालणाऱ्या अवजड वाहनांमुळे दुचाकीधारक तसेच पादचाऱ्यांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

गेल्या दोन-तीन महिन्यांपासून शिर्डीकडे (shirdi) जाणाऱ्या साईदर्शनासाठी मुंबई (mumbai) येथून पालख्या मार्गस्थ होत आहेत. पालख्यांमध्ये पायी चालणाऱ्या भक्तांना आकडा हजारोंच्या घरात असतो. जवळचा मार्ग म्हणून सर्वच पालख्या घोटी (ghoti) महामार्गाने येत असतात. मात्र, या भक्तांना रस्त्याच्या कडेने चालण्यासाठी जागाच शिल्लक नसल्याने परिणामी त्यांना डांबरी रस्त्यावरून चालावे लागते.

काहीवेळा रात्रीच्यावेळी साईभक्त वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. काहीवेळा रात्रीच्यावेळी साईभक्त वाहनाच्या धडकेत जखमी झाल्याच्याही घटनाही घडल्या आहेत. यामुळे, सार्वजनिक बांधकाम विभागाने महामार्गाच्या दोन्ही बाजूच्या साईडपट्ट्या पुन्हा नव्याने तयार कराव्यात अशी मागणी होत आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com