
नाशिक । प्रतिनिधी Nashik
श्री काळाराम मंदिर संस्थानच्यावतीने ( Shri Kalaram Mandir Trust )वासंतिक नवरात्र महोत्सवात आज दुपारी श्रीराम नवमीच्या मुहूर्तावर रामजन्मोत्सव ( Ramjanmostav )मोठ्या भक्तिभावाने संपन्न झाला.
सकाळी पाच वाजून 30 मिनिटांनी काकड आरती झाली.सात वाजता या वर्षाचे मानकरी देवेंद्र व पुजारी यांच्या हस्ते श्रीरामाची महापूजा करण्यात आली.श्रीराम अशा मूर्तीला महावस्त्र परिधान करून पारंपारिक दागिने आभूषणे व फुलांचा शृंगार मिनल पुजारी व पराग पुजारी यांच्या हस्ते करण्यात आला. दुपारी बारा वाजता देवेंद्र पुजारी यांच्या हस्ते महाआरती झाली.व राम उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला.कीर्तनकार महिला मंडळी व भाविक यांनी पाळणा म्हणून श्रीरामाचा रामजन्मोत्सव मोठ्या भक्तीभावाने साजरा केला.
दोन वर्षाच्या निर्बंध नंतर पहिल्यांदा मोकळ्या वातावरणात यंदा उत्सव साजरा झाला. सोमवारी (ता. 11) सुरेश पारीक व राम अवतार पारीक हे संगीतमय सुदरकांड सायंंकाली पाचला सादर करणार आहेत. आजच्या सोहळ्यास विश्वस्त धनंजय पजारी, शांताराम अवसरे, एकनाथ कुलकर्णी , दिलीप कैचे, मंंगेश पुजारी, मंदार जानोरकर, दत्त्त्त प्रसाद निकम, शाम मंत्री, मिलींंद तारे, सुधीर पुजारी,आदिसह भाविक उपस्थित होते..शहरात दुपारी बाराला विविध श्रीराम जन्मोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी रामनामाचा जयघोष झाला.
पंचवटीतील गोरेराम मंदिर, रामकुंडावरील अहिल्यादेवी मंदिर, तपोवनातील श्रीराम पर्णकुटी, रविवार कारंजा परिसरातील तेली गल्लीतील राम मंदिर, मुठे गल्लीतील राम मंदिर, भोसला मिलिटरी कॉलेजच्या आवारातील राम मंदिर, नाशिकरोडला मुक्तिधाम, टाकळी मठ व परिसरातील बिर्ला मंदिर, तसेच वाल्मीकनगर येथील श्रीराम मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम झाले.