उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराजांची यात्रौत्सोव रद्द

उंटवाडी येथील श्री म्हसोबा महाराजांची यात्रौत्सोव रद्द

नवीन नाशिक l New Nashik (प्रतिनिधी) :

सध्या सर्वत्र करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आसल्याने राज्यसरकारने राज्यातील सर्व धार्मिक स्थळांसह यात्रौत्सोवाला बंदी घातली आहे.

या पार्श्वभूमीवर गतवर्षाप्रमाने यंदाच्या वर्षीही उंटवाडीसह पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्यदैवत अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराजांचा यात्रौत्सोव रद्द करण्यात येणार असल्याचे म्हसोबा देवस्थानचे अध्यक्ष मधुकर तिडके यांनी मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत जाहीर केले.

दरम्यान संस्थानचे उपाध्यक्ष दिनकर तिडके यांनी सपत्नीक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर "श्री"ची पुजा करुन देवदिवाळी साजरी केली. उंटवाडीसह मोरवाडी, कामटवाडे, अंबड, पाथर्डी वडनेर दुमाला पिंपळगांब बहुला आदी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आराध्यदैवत असलेल्या अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज यांच्या यात्रेला सुमारे ३०० हुन अधिक वर्षाची परंपरा आहे.

श्री म्हसोबा महाराज हे स्वयंभू असल्याने त्या धार्मिक स्थळाला विषेश महत्व आहे. त्यामुळे पंचक्रोशीतील ग्रामस्थंचा म्हसोबा महाराज यात्रा हा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. यात्रौत्सोवानिमित या ठिकाणी कुस्त्यांच्या दंगलीही होतात या दंगलीत दुरदुरचे कुस्तीगीर सहभागी होत असतात.

मात्र गेल्या वर्षात आणि चालु वर्षात कोरोनाची महामारी आल्याने सर्वच यात्रौत्सव रद्द झाले आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यशासनाने काही नियमावली तयार केली असल्याने शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत या वर्षी होणारा यात्रौत्सोव विश्वस्तांची बैठक घेऊन रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दरम्यान परंपरेनुसार मंदिर संस्थानच्या वतीनेश्री म्हसोबा महाराजांना पंचामृताने स्नान करण्यात आले त्यानंतर मंदिरात मनोभावे पूजा बांधण्यात येऊन देवदिवाळी करण्यात आली त्यानंतर सर्व विश्वस्तांच्या हस्ते "श्रीं" आरती करण्यात आली.

यावेळी अतिप्राचीन श्री म्हसोबा महाराज देवस्थान समितीचे सचिव सदाशिव नाईक, कोषाध्यक्ष अंबादास जगताप, रामचंद्र तिडके, विलास जगताप, दत्ता पाटील, बाजीराव तिडके, विठ्ठलराव तिडके, फकिरराव तिडके, कवी जगन तिडके, विष्णु जगताप, संतोष कोठावळे, आण्णा पाटील आदींसह म्हसोबा महाराज भक्त परिवार उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com