त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन!

आद्य शंकराचार्यांच्या मूर्तीचे पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ येथे अनावरण
त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन!

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

आज देशभरात ८२ तीर्थक्षेत्री कार्यक्रमांचे आयोजन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या हस्ते पाडव्याच्या मुहूर्तावर आज पार पडले. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत त्र्यंबकेश्वरमध्ये थेट केदारनाथाचे दर्शन (Kedarnath Darshan) झाल्याने भाविकांनी आनंद व्यक्त केला....

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात घडले केदारनाथ दर्शन!
पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथांच्या चरणी; आदि शंकराचार्यांच्या मुर्तीचं केलं अनावरण

आज श्री क्षेत्र केदारनाथ (Shri Kshetra Kedarnath) येथे श्रीमद आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे व मूर्तीचे अनावरण झाले. या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते केदारनाथ धाम येथे झालेल्या २०० कोटींच्या विकासकामांचे उद्घाटन तर २०० कोटींच्या विकासकामांचे भूमिपूजनही पार पडले. या कार्यक्रमानिमित्ताने आद्य शंकराचार्यांनी ज्या तीर्थक्षेत्रांना पदस्पर्श केला तसेच १२ ज्योतिर्लिंग अशा देशभरातील ८२ तीर्थक्षेत्री भारतीय जनता पार्टीतर्फे देशव्यापी कार्यक्रम झाले.

राज्यात या निमित्ताने त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, औंढा नागनाथ तसेच पंढरपूर , माहूर , कोल्हापूर , तुळजापूर येथे कार्यक्रम झाले.

या कार्यक्रमांत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यमंत्री कपिल पाटील, डॉ. भारती पवार यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. या ठिकाणी भजन , नाम संकीर्तन , आरती , साधू महंतांचा सत्कार असे कार्यक्रम पार पडले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com