
ओझे | Oze
नाशिक शहरात पंचवटी येथे १९९४ साली प्रकाश पंड्या यांनी स्थापन केलेल्या श्री हरी ओम अर्बन को ऑप क्रेडिट सोसायटी लि. या पतसंस्थेची सन २०२३-२०२८ या सालाकरीता झालेली पंचवार्षिक निवडणुक एकमताने बिनविरोध पार पडली. दि.२५ ऑक्टोवरला अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी ११ जणांचे उमेदवारी अर्ज शिल्लक राहिल्याने निवडणूक बिनविरोध पार पडली.
उमेदवार सर्वसाधारण गट ६, स्री राखीव गट २, भ.वि.जा. ज गट १, अनु.जा.ज गट १, इ. मा. गट १ असे ११ उमेदवार बिनविरोध निवडून आले. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन सहकार विभागातील अधिकारी शरद कासार यांनी कामकाज पाहिले. १९९४ साली फक्त २०० रुपये दरमहा भाडेतत्वावर छोट्याशा जागेत या पतसंस्थेचे कामकाज सुरू झाले.
पुढील काळात भागभांडवल, ठेवी, कर्जदार, खातेदार, ग्राहक वाढले व पतसंस्थेने इमारत निधीमधून स्वमालकीची जागा घेतली.आजमितीस पतसंस्था स्वमालकीच्या प्रशस्त जागेत संपुर्ण संगणकीकरण, ग्राहकांना विनम्र व तत्पर सेवा, सर्वसामान्यांना त्वरित कर्ज पुरवठा, घरपोच सेवा, ग्राहकांच्या सूचनांची दखल घेऊन त्वरित सोडविणे अशा प्रकारे विविध उपक्रमांमुळे पतसंस्था भरभराटीस आली आहे.
पतसंस्थेचे बिनविरोध निवड झालेले संचालक कादवा सहकारी साखर कारखाना,ऊमराळे बु: वि. का. सोसायटी व नाशिक जिल्हा पतसंस्था फेडरेशचे संचालक सुनील केदार, मनिलालभाई पटेल, कैलास खुर्दळ, प्रविण वाणी, सुभाष पगारे, राजेश रूंगठा, गंगारामभाई पटेल, कैलास हेकरे, रंजन बिरारी, वंदना बांगर, छाया धात्रक यांनी सर्वांचे आभार मानले.
पतसंस्थेच्या शाखा विस्तार व व्यवसाय वाढ करणे यावर आमच्या नवनिर्वाचित संचालक मंडळाचा भर राहील असे त्यांनी सांगितले. नाशिक शहरामधील सर्व सभासद, खातेदार, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक यांनी पतसंस्थेच्या व्यवहार वाढीस हातभार लावावा असे आवाहन संचालक मंडळाच्या वतीने सुनिल केदार यांनी याप्रसंगी केले.