बाप्पाची मूर्ती बैलगाडीत विराजमान

बाप्पाची मूर्ती बैलगाडीत विराजमान

नाशिक । प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशअध्यक्ष (Regional President of Swabhimani Shetkari Sanghatna) कवी संदीप जगताप ( Sandip Jagtap )यांच्या चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक येथील स्वतःच्या शेतामधील घरात गणपती बाप्पाची बैलगाडीमध्ये मनोभावे स्थापना करण्यात आलीआहे.

इडा पिडा टळू दे

बळीचे राज्य येऊ दे...

पाऊस पडला राज्यभर

त्याला भाव मिळू दे..!

अशी प्रार्थना करणारा फलक व वृक्ष संवर्धनाचा संदेश देणारा देखावा संदीप जगताप यांनी उभारलेला आहे.

या गणपती बाप्पाच्या स्थापनेच्या वेळेस त्यांच्या कुटुंबातील आई-वडील, पत्नी व मुलगा शाहू हे उपस्थित होते. सर्वांनी मनोभावाने गणपती बाप्पाची पूजा करून शेतकऱ्यांची समृद्धी होऊ दे राज्यातला शेतकरी सुखी राहू दे असे प्रार्थना केली आहे.

गणपती बाप्पाच्या स्थापने नंतर बोलताना प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांसमोर अनेक प्रश्न आहे. बी-बियाणं तुटवडा, खत- औषधांचे गगनाला भिडलेले भाव .भाजीपाल्याला व कांद्याला असणारा मातीमोल भाव .यामुळे या राज्यातील शेतकरी त्रस्त आहे. त्या शेतकऱ्याला मदत करण्याची सद्बुद्धी गणपती बाप्पाने केंद्र आणि राज्य शासनाला द्यावी. शेतकऱ्यांना त्याच्या घामा एवढ मोल मिळावं. इडा पिडा टळु दे..बळीच राज्य येऊ दे.. पाऊस भरपूर पडलाय.. पिकाला भाव मिळू दे.. अशी प्रार्थना मी गणपती बाप्पाकडे केली.अस सांगितलं.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com