त्र्यंबक परिसरात श्रावण सरींची बरसात, भात पिकांना 'दिलासा'

त्र्यंबक परिसरात श्रावण सरींची बरसात, भात पिकांना 'दिलासा'

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwer

तालुक्यात (Trimbak Taluka) गेल्या काही दिवसापासून सुरू असलेला ऊन पावसाचा खेळ आहे. दरम्यान आज सकाळपासून त्र्यंबक परिसरात पावसाची रिपरिप (Rain in Trimbakeshwar area) सुरू असल्याने भात पिकांना (Rice Crop) जीवदान मिळणार आहे.

तालुक्यात पावसाने ओढ दिल्याने खरिपातील पिके करपू लागली होती. त्यामुळे शेतकरी भिज पावसाची वाट पाहत होते. त्यातच आज सकाळपासून पावसाचे पुन्हा पुनरागमन झाले. त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवात जीव आला आहे.

दरम्यान तालुक्यात काही दिवसापासून ऊन पावसाचे वातावरण होते. या काळात शेतकऱ्यांनी टोमाटो लागवडीवर (Tomato Cultivation) भर दिला. त्यातच आज सकाळपासून श्रावण सरींची (Shravan Rain) बरसात सुरू असल्याने खरीप हंगामातील (Kharip Season) पीकवाढीच्या अवस्थेततील पिकांना राहत मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com