सातपूर | प्रतिनिधी

रविवारी मध्यरात्री श्रमिकनगर बस स्टॉपजवळील गायत्री स्वीट मार्ट या दूकानाला अचानक आग लागली. निवासी वसाहत लागूनच असल्याने नागरीकांची एकच धावपळ उडाली होती. अग्निशमन पथकाने तातडीने धाव घेत आग आटोक्यात आणल्यामुळे नागरिकांनी सूटकेचा निश्वास सोडला.

श्रमिकनगर बस स्टॉपजवळील गायत्री स्वीट मार्ट या दूकानाला अचानक आग लागली. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी सांगण्यात आले. या आगीत गायत्री स्वीट हे दुकान हे पूर्ण जळून खाक झाले.

परिसरातील सामाजिक कार्यकर्ते साहेबराव जाधव यांनी अग्निशामक दल व सातपूर पोलिसांना घटनेचे वृत्त कळवले.

सातपूर अग्निशामक दलाच्या जवानांसह पाच बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तब्बल पाऊणतास झूंज देत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.

या दुकानालगतच निवासी वसाहत असल्याने सुदैवाने आग तातडीने आटोक्यात आल्याने मोठी र्दुघटना टळली. सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पो.निरीक्षक किशोर मोरे हेदेखील घटनास्थळी दाखल झाले होते.

गर्दीवर नियंत्रण राखल्याने अग्निशमन पथकाला सूलभतेने काम करणे शक्य झाले. ही आग पाहण्यासाठी परिसरातील नागरीकांनी मोठी गर्दी जमली होती.