पॅसेंजरला हिरवा कंदिल दाखवा

त्रस्त प्रवाशांचे रेल्वे प्रशासनाला साकडे
पॅसेंजरला हिरवा कंदिल दाखवा

मनमाड । बब्बू शेख Manmad

करोना (corona) उद्रेकामुळे प्रादुर्भाव वाढू नये यासाठी रेल्वेतर्फे (Railways) अनेक एक्स्प्रेस (Express) व पॅसेंजर (Passenger) रेल्वेसेवा (Railway service) बंद करण्यात आली होती. करोना जसजसा नियंत्रणात येवू लागला तसतसे निर्बंधांचे पालन करीत आरक्षण करणार्‍या प्रवाशांसाठी बहुतांश एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत.

मात्र ग्रामीण भागातील बहुतांश स्थानकावर थांबणार्‍या व कमी तिकिट दरात प्रवास शक्य असणार्‍या पॅसेंजर रेल्वेला (Passenger train) अद्याप हिरवा कंदिल दिला जात नसल्याने चाकरमान्यांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल थांबत नसल्याने ते त्रस्त झाले आहेत. करोना नियंत्रणात असल्यामुळेच काही निर्बंध ठेवत शासनातर्फे सर्व अनलॉक (unlock) केले जात आहे.

एस.टी. बससेवा (S.T. Bus service), व्यापारी प्रतिष्ठाने असो की शाळा-विद्यालये (Schools) इतकेच नव्हे तर करमणुकीचे साधन असलेल्या चित्रपटगृहे (Theaters) देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. सर्वकाही सुरळीतरित्या सुरू झाले असतांना फक्त चाकरमाने व गोरगरीब प्रवाशांचा आधारवड ठरलेल्या पॅसेंजर रेल्वेंनाच कां परवानगी दिली जात नाही? पॅसेंजरमुळेच करोना वाढणार आहे कां? असा सवाल संतप्त प्रवाशांतर्फे उपस्थित केला जात आहे.

भुसावळ (bhusawal) विभागात मनमाड रेल्वे जंक्शन (Manmad Railway Junction) महत्वपुर्ण मानले जाते. 125 रेल्वेंची ये-जा या स्थानकातून होत असते. देशाच्या कानाकोपर्‍यात जाण्याची सोय एक्स्प्रेस रेल्वेंमुळे मनमाड स्थानकावरून झाली आहे. तसेच मुंबई (mumbai), औरंगाबाद (Aurangabad), पुणे (pune) व भुसावळ या चारही मार्गांवर पॅसेंजर रेल्वे धावत असल्याने चाकरमान्यांसह गोरगरीब प्रवाशांची मोठी सोय झाली होती.

ग्रामीण भागात असलेल्या रेल्वे स्थानकांवर पॅसेंजर थांबत असल्याने कमी दरात इच्छित स्थळ गाठता येत असल्यामुळे पॅसेंजर रेल्वेला प्रवाशांनी पसंती दिली होती. इंधन दरवाढीमुळे एस.टी.चे वाढलेले भाडे तसेच खाजगी वाहन परवडत नसल्यामुळे देखील पॅसेंजरच्या माध्यमातून कमी तिकिटमध्ये प्रवास करता येत असल्याने मनमाड रेल्वे जंक्शनवर प्रवाशांची वर्दळ कायम राहिली आहे.

मनमाड स्थानकावरून सुटणार्‍या मनमाड-इगतपुरी शटल (Manmad-Igatpuri shuttle), भुसावळ-मुंबई पॅसेंजर (Bhusawal-Mumbai Passenger), भुसावळ-नाशिक (Bhusawal-Nashik) तसेच मनमाड-पुणे पॅसेंजर (Manmad-Pune Passenger) या गाड्यांना स्थानिकच नव्हे तर जिल्ह्यातील प्रवाशांची पसंती मिळाली होती. मनमाडसह इतर शहरातील अनेक चाकरमाने या पॅसेंजर रेल्वेने नाशिक व पुण्याला ये-जा करत असत. मात्र करोना उद्रेकामुळे पॅसेंजर रेल्वेची सेवा बंद झाल्याने तसेच जनरल तिकिट व चाकरमान्यांना पास उपलब्ध होत नसल्यामुळे प्रवास करायचा कसा? असा प्रश्न अनेक चाकरमान्यांपुढे उभा ठाकला आहे.

एक्स्प्रेस रेल्वेतून आरक्षणाशिवाय प्रवास शक्य नाही त्यामुळे कमी पगार असलेल्या नाशिक, पुणे औरंगाबाद येथे नोकरीसाठी ये-जा करीत असलेल्या अनेक चाकरमान्यांना आपल्या नोकरीस मुकावे लागले आहे. पॅसेंजर अभावी अंत्यविधी अथवा लग्न सोहळे असो की इतर कार्यक्रम यांना हजेरी लावणे देखील अशक्य बनले आहे.

शासनातर्फे निर्बंध टाकत एक्स्प्रेस गाड्या सुरू करण्यात आल्या आहेत. मात्र अद्याप गोरगरीबांसाठी महत्वपुर्ण असलेल्या पॅसेंजर गाड्या सुरू करण्यात न आल्याने प्रवाशांचे हाल सुरूच आहे. लग्न सोहळ्यांना नुकताच प्रारंभ झाला आहे. परंतू एस.टी. बससेवा आंदोलनामुळे (agitation) बंद आहे. इंधन दरवाढीमुळे (Fuel price hike) खाजगी वाहनातून प्रवास करणे शक्य नाही.

त्यामुळे नातेवाईकांकडे जायचे कसे? असा प्रश्न संत्रस्त प्रवाशांतर्फे उपस्थित केला जात आहे. लॉकडाऊन (Lockdown) नंतर सर्व जनजीवन पुर्वपदावर आले आहे. एक्स्प्रेस रेल्वे देखील सुरळीत सुरू आहे. त्यामुळे पॅसेंजर गाड्या देखील सुरू करत रेल्वे प्रशासनाने सर्वसामान्य जनतेस दिलासा द्यावा, अशी मागणी प्रवाशांतर्फे केली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com