शाळा सुरू कराव्यात का?

शिक्षण विभागाकडून सर्वेक्षण
शाळा सुरू कराव्यात का?

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनामुळे ( corona ) दोन शैक्षणिक वर्ष प्रभावित झाले असून अनेक दिवसांपासून शाळा ( schools) , बंद आहे. करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता शालेय शिक्षण विभागाने राज्यातील कोविड मुक्त गावांमधील इयत्ता आठवी ते बारावीचे वर्ग 15 जुलै पासून सुरु करण्यासाठी मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्याबाबत पालकांना काय वाटते? याबाबत सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने ( Department of Education ) घेतला आहे. या सर्व्हेक्षणात पालक आणि विद्यार्थ्यांना अभिप्राय नोंदवता येणार आहे.

कोविडची दुसरी लाट आटोक्यात आल्यानंतर आता शाळा सुरु कराव्या की नाही, याबाबत अनेक मते आहेत. काही पालक पालक, शिक्षक वर्ग सुरू करण्याच्या बाजूने आहेत तर काहींच्या मते शाळा सुरू करण्याचा निर्णय घाईचा होईल. त्यामुळे शालेय शिक्षण विभागाने राज्यातील पालक, शिक्षक यांच्याकडून इयत्ता आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्याबाबत सर्व्हेक्षण हाती घेण्यात आले आहे. सोमवारी (दि.12) रात्री 11.55 पर्यंत हे सर्व्हेक्षण सुरू राहणार आहे. सर्व्हेक्षणानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगीतले जात आहे.

येथे नोंदवता येईल अभिप्राय

सर्व्हेक्षणासाठी शालेय शिक्षण विभागाने http://www.maa.ac.in/survey ही लिंक उपलब्ध करून दिली आहे. ही लिंक ओपन केल्यानंतर आपला जिल्हा जिल्ह्यातील तालुका निवडा आपले पूर्ण नाव, मोबाईल क्रमांक,शाळा शहरी भागात येते की ग्रामीण, आपले पाल्य कोणत्या वर्गात शिकता? शाळा कोणत्या भागात येते? कोविडशी संबंधीत आवश्यक त्या सर्व सुरक्षा विषयक उपाययोजना करून प्रत्यक्ष शाळा सुरु झाल्यास आपल्या पाल्यास शाळेत पाठविण्याची आपली तयारी आहे का?असे आठ प्रश्न विचारले जातात. राज्यातील शिक्षक, मुख्याध्यापक, अधिकारी, पालकांना यावर आपले मत नोंदवता येणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com