शेतीकामाला मनुष्यबळ टंचाईचे ग्रहण; मजुराअभावी तणनाशक फवारणी

शेतीकामाला मनुष्यबळ टंचाईचे ग्रहण; मजुराअभावी तणनाशक फवारणी

पिंपळस रामाचे । वार्ताहर | Pimplas

खरिप हंगामामध्ये (Kharif Seadon) यंदा सर्वत्र वेळेवर पुरेसा पाऊस (rain) झाल्याने शेतीकामांना वेग आला आहे.

जवळपास सर्वच शेतकर्‍यांची (farmers) पेरणी देखील पूर्ण झालेली आहे. अशा पेरलेल्या पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात तण वाढीस लागलेले असून मका (Maize), सोयाबीन (soybeans), ऊस (sugar cane) व इतरही पिकांमध्ये यंदा तणांचे प्रमाण मोठे आहे.

अशी तणे पिकातून काढण्यासाठी शेतकर्‍यांना मजुरीचा वाढलेला दर परवडत नसून नाईलाजाने शेतकरी (farmers) तणनाशकाची फवारणी करत असले तरी तणनाशकांच्या किंमतीत भरमसाठ वाढ झाल्याने व त्यातही अनेक बनावट कंपन्या दाखल झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या वर्षी दुपटीपेक्षा अधिक वाढलेले तणनाशकांचे भाव त्यातच विशिष्ट प्रकारच्या तणनाशकाने

विशिष्ट प्रकारची वनस्पती (plant) जळत असल्याने एका शेतामध्ये व एकाच पिकामध्ये अनेकविध प्रकारची तणे उगवत असल्याने कोणत्या तणनाशकांची फवारणी करावी या समस्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला असून काही शेतकरी दुकानदारांच्या सल्ल्याने वेगवेगळ्या प्रकारची तणनाशके एकत्र करून फवारणी करत आहे. अनेक शेतकर्‍यांना तणनाशकाची फवारणी करून देखील परिणाम मिळत नसल्याने अशा शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागत असून पिकांची निगराणी राखण्यासाठी कसरत करावी लागत आहे.

तसेच तणनाशकांचा पिकांवर व जमिनीवर विपरीत परिणाम होण्याची शंका देखील तज्ज्ञ शेतकरी व्यक्त करत असून यासंदर्भात शेतकर्‍यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे. शासनाच्या कृषी विभागाच्या (Department of Agriculture) वतीने शेतकर्‍यांना तणनाशकाच्या फवारणी संदर्भात उचित व वेळेत मार्गदर्शन करावे व कृषी विभागाच्या वतीने तणनाशकांचा वापर व प्रमाणाबाबत शेतकर्‍यांना सल्ला देवून तणनाशकांच्या किमती संदर्भात देखील शासनाने नियंत्रण आणावे.

कमी किमतीत चांगल्या दर्जाची व योग्य मार्गदर्शनाखाली शेतकर्‍यांना तणनाशके उपलब्ध झाली पाहिजे अशी मागणी येथील प्रगतिशील शेतकरी पुंडलिक सुरवाडे यांचेसह अनेक शेतकर्‍यांनी केली असून यावर वेळीच उपाय व मार्गदर्शन न झाल्यास शेतकर्‍यांना आर्थिक भुर्दंडासह शेतजमिनीची पोत देखील खराब होण्याची भीती या शेतकर्‍यांनी व्यक्त केली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com