सोंगणीला मजुरांची टंचाई

सोंगणीला मजुरांची टंचाई

मोहबारी । वार्ताहर Mohbari-Kalwan

कळवण तालुक्यात (kalwan taluka) बाजरी, भात व इतर शेतीपिके सोंगणीसाठी शेतकर्‍यांची लगबग सुरु झाली आहे. शेतकरी (farmers) वर्ग आपल्या शेतातील कामे रात्र दिवस कष्ट करून पिकाला योग्य ते भाव मिळत नसल्याने शेतकरी नाराज होत असतो. कर्जबाजारी झालेल्या शेतकर्‍यांपुढे मोठे संकट उभे राहिले आहे.

कळवण तालुक्यात खरिपातील बाजरी (Millet) हे प्रमुख पीक आहे. हे पीक जिरायती क्षेत्रावर पावसाच्या पाण्यावर हे पीक घेतले जाते. मका, सोयाबीन, भुईमुग, ऊडीद, भात, वरई, टोमॅटो आदी पिकेही घेतले जातात. यातच यंदा पावसाला उशिरा सुरुवात झाल्याने बाजरीची पेरणीही उशिरा झाली. त्यातच अतिवृष्टीमुळे (heavy rain) बाजरी उत्पादनात व इतर पिकान मध्ये घट होण्याची शक्यता आहे.

शेतकर्‍यांनी घरापुरती बाजरी टाकली तर यातच अतिवृष्टीमुळे काही भागात बाजरीचे व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वारा आणि पावसामुळे अनेक भागात बाजरी पीक व इतर पिके आडवे झाले होते. कापणी लवकर आटोपत नसल्यामुळे मजुरीचा दर वाढवून द्यावा लागत आहे. पूर्वीसारख्या बाजरीची सुड्या (गरी) घालण्याची पद्धत जवळजवळ आजही दिसून येत आहे.

काही शेतकरी बाजरी कापणीनंतर व उभ्या पिकावरही कणसे काढली जातात. काही शेतकरी लगेच कणसांची काढणी करुन घेतात. सध्या वातावरण ढगाळ व थोडा स्वच्छ असल्यामुळे शेतकरी वर्गाची चांगलीच फजीती केली असली तरिही शेतातील सर्व कामे एकाच वेळी आल्याने सर्वच कामे करावी लागत आहे. सर्वच कामे एकाच वेळी आल्याने शेतकरी वर्गाचे नेहमीचे गणिताचे सुत्र चुकल्याची गत झाली आहे.

सध्या शेतातील कामे मजुरांअभावी (laborers) घरच्या घरी करावी लागत आहे. तर यातच पावसामुळे अपले पिक खराब होऊनही म्हणून नाविलाजाने जास्त पैसे मोजून मक्ता पद्धतीने कामे वेगाने सुरू आहे. हीच परिस्थिती अन्य गावा मध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com