रब्बी हंगाम अडचणीत; दिंडोरी तालुक्यात रासायनिक खतांची टंचाई

खते
खते

ओझे l विलास ढाकणे | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या एक महिन्यापासून महत्वाच्या रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाल्यामुळे पिकांना पाहिजे ते खत उपलब्ध होत नसल्यामुळे उत्पादनात घट निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. नाशिक जिल्ह्यासह तालुक्यातील कृषी विभागाने रासायनिक खते (Chemical fertilizers) उपलब्ध करून देण्याची मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे....

तालुक्यात सध्या युरिया १०.२६, २६, २४, २४.० या पिकांला महत्वाच्या समजल्या जाणारे खते गेल्या एक महिन्यापासून कृषी केंद्रामध्ये कुठेही उपलब्ध नाही. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर घट निर्माण होत आहे. त्यात विद्रव्य खताच्या गोणीची किंमत ५ हजारापर्यंत पोहचल्यामुळे शेतकरी दाणेदार रासायनिक खताना पसंती देताना दिसत आहे.

यंदा खरीप हंगामात तालुक्यात अतिवृष्टीमुळे जमिनीची मोठ्याप्रमाणात धुप झाली असून जमिनीतील सर्व खते व अन्नद्रव्य वाहून गेल्यामुळे सध्या पिकांच्या वाढीसाठी व फळे व भाजीपालाच्या पोषणासाठी उत्पादन वाढीसाठी पिकांना त्वरित लागू होणाऱ्या रासायनिक खताची सध्या आवश्यकता आहे.

खरिप हंगामात अशीच टंचाई निर्माण झाली होती. त्यात आता पुन्हा गहू, कांदा व इतर भाजीपाला पिकांना महत्वाच्या रासायनिक खताची आवश्यकता असताना पुन्हा रब्बी हंगाम जोमात असताना रासायनिक खताच्या टंचाईमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. रासायनिक खताची टंचाई निर्माण झाल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सेंद्रीय खताबरोबर सध्या रासायनिक खताची आवश्यकता पिकांना भासत आहे. सध्या तालुक्यात टोमॅटो, दुधी भोपळा, कारली, दोडका, घेवडा, भेंडी यांसारख्या भाजीपाला पिकांची लागवड होणार आहे.

बळीराजाची रब्बी हंगामातील गहू पेरणी व कांदाची लागवड झालेली आहे. यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक असणारी रासायनिक खते उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

सरासायनिक खताच्या किंमती प्रंचड वाढल्याने शेतकरी हतबल झाला आहे. बाजारात महत्वाची रासायनिक खते उपलब्ध होत नसल्यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. कृषी विभागाने बळीराजाची रासायनिक खताची समस्या त्वरित मार्गी लावावी.

- जयदिप देशमुख, शेतकरी, करंजवण.

दिंडोरी तालुक्यात येत्या चार ते पाच दिवसंत युरिया खत उपलब्ध होणार असून शेतकरी वर्गाने कृषी केंद्रामध्ये पर्यायी खते उपलब्ध असून या खताचाही वापर करावा. टंचाई असलेले युरिया खत उपलब्ध झाल्यास तालुक्यातील सर्व कृषीकेंद्रांना कोणतीही लिकिंग न करता खते शेतकरी वर्गाला द्यावी, अशा सचूना देण्यात आल्या आहे.

- दिपक सांबळे, कृषी अधिकारी पं. समिती, दिंडोरी.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com