बिटको हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये शॉर्टसर्किट

एक व्हेंटिलेटर जळाले
बिटको हॉस्पिटलच्या कोविड सेंटरमध्ये शॉर्टसर्किट
USER

नासिक रोड | Nashik

नवीन बिटको कोव्हीड सेंटरमध्ये अचानक संध्याकाळी सात वाजता शॉर्टसर्किट झाल्याने एकच खळबळ उडाली.

सुदैवाने कोणतीही जीवित हानी नसल्याचे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्वर यांनी माहिती दिली. येथील रुग्णांवर योग्य उपचार चालू असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

मंगळवारी सायंकाळच्या सुमारास नवीन बिटको कोविड सेंटरमध्ये अचानक शॉर्टसर्किट झाल्याने व्हेंटिलेटर जळाल्याची घटना घडली. यामध्ये चार व्हेंटिलेटर अचानक बंद पडले. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन येथील रुग्णांना इतरत्र हलवले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही, असे वैद्यकीय अधिकारी जितेंद्र धनेश्वर यांनी दिली.

दरम्यान व्हेंटिलेटरमध्ये अचानक जाळ कसा झाला याबाबत चौकशी प्रशासन करीत आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com