मोकाट जनावरांचा धुडगूस; दुकानांचे नुकसान

कॅन्टोन्मेंट प्रशासनकडून दखल; कोंडवाड्याची स्वच्छता
मोकाट जनावरांचा धुडगूस; दुकानांचे नुकसान

दे. कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

देवळाली कॅम्पच्या विविध भागात सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट वाढला असून काल सायंकाळी शहरातील हौसन रोडवरील Housan Road फुटवेअयरच्या दुकानाला धडक देत, दर्शनी भागातीळ काच मोकाट जनावरांनी फोडल्याने नागरिक व व्यवसाईक भयभीत झाले आहेत, दरम्यान कॅन्टोन्मेंट प्रशासनने कोंडवाड्याची स्वच्छता करता लवकरच मोकाट जनावरे यात जेरबंद करणार असल्याचे जाहीर केले,याबाबत दैनिक देशदूत ने 2 दिवसांपूर्वीच याबाबत वृत्त दिले होते.

मोकाट जनावरे यामुळे नागरिक,व्यापारी मोठ्या प्रमाणावर बेजार झाले होते. भररस्त्यात दोघा जनावरांची झालेले लढाई ही नागरिकानी भगीतली होती पाठोपाठ भर बाजारपेठ मध्ये शो रूम च्या काचा फोडून जनावरे दुकानात धडकले त्यामुळे अधिकच भीतीदायक वातावरण निर्माण झाले, याची व देशदूत रुताची दखल घेत ही मोकाट जनावरे पकडण्यासाठी कारवाई करण्यात येईल असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राहुल गजभिये यांनी स्पस्ट केले तसे आश्वासन त्यांनी माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया यांनी दिले .वास्तविक ही सर्व जनावरे पाळीव आहेत मात्र ते रस्त्यावर ठाण मांडून बसतात, त्यामुळे अपघाताला आयतेच निमंत्रण मिळत आहे.

लॅमरोड भागातून देवळालीत प्रवेश करतांना तसेच रेस्ट कॅम्प रोडवर अशा जनावरांनी उच्छाद मांडला आहे. रस्त्याने ये-जा करणार्या वाहनचालकांना या जनावरांच्या रस्ते अडवणुकीमुळे विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशा मोकाट किंवा मालक असलेल्या जनावरांबाबत कॅन्टोन्मेन्ट प्रशासन यांनी धोरण निश्चित करण्यात येत आहे. येथील लॅमरोड, हौसन रोड, रेस्ट कॅम्प रोड, आनंद रोड या परिसरात सातत्याने मोकाट जनावरांमुळे अपघात होतात.

गवळीवाडा भागात मागे मोकाट गायींच्या धडकेने दोन स्त्रियांचे हात मोडले होते.तर नुकतेच नवीन बसस्थानक वर एका मोकाट जनावराने एका महिलेला धडक दिल्याने त्या महिलेस गंभीर दुखापत झाली होती. नुकतेच गुरुवारी सायंकाळी भर रस्त्यावर दोन मोकाट जनावरांच्या झुंज झाल्याने ती झुंज थेट हौसन रोडवरील एका फुटवेअयरच्या दुकानाची दर्शनी भागात असलेल्या काचेच्या दरवाज्यावर धडकले, त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे.त्या मोकाट जनावरांना आवर घालण्यासाठी कॅन्टोन्मेंट बोर्डाने ठोस पावले उचलत असून त्याची दखल घेत शुक्रवारी कोंडवाडा स्वच्छ करण्यात आला असून लवकरच मोकाट जनावरांवर कारवाई करण्यात येईल असे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आरोग्य विभागाकडून सांगितले.

प्रलंबित प्रश्न मार्गी लावा

कॅन्टोन्मेंट बोर्डात ठराव पारित केला होता त्यानुसार वॉर्ड क्रमांक 1,2,3 सदर बाजार भागात बंद असलेला कोंडवाडा पुन्हा चालू करण्यात आला असून, जे मोकाट जनावरे बाजार भागात रस्त्यावर आढळून आल्यास त्यांना कोंडवाड्यात बंद करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राहुल गजभिये यांनी सांगितले. प्रशासनाने आनंदरोड परिसरात असलेल्या बोर्डाचे जागेत नवा कोंडवाडा तयार करावा तसेच वॉर्ड 7 साठी शिगवे बहुला व वॉर्ड 8 साठी विजयनगर भागात कोंडवाडा बांधण्यात यावा याकामी पूर्वीच्या बोर्डाने योग्य ती तरतूद करून ठेवलेली आहे, कोविड मुळे हा प्रश्न प्रलंबित राहिला असून नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

- भगवान कटारिया, माजी उपाध्यक्ष

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com