पंचवटीतील मुख्य बाजारपेठेत दुकानंदारांचे अतिक्रमण

पंचवटीतील मुख्य बाजारपेठेत दुकानंदारांचे अतिक्रमण
मुख्य बाजारपेठ

पंचवटी | Panchavti

गत काही वर्षांपासून पंचवटी परिसराचा (Panchavati Area) झपाट्याने विकास होत आहे. श्रीराम चंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीला अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. देशविदेशातून लाखो भाविक याठिकाणी येत असतात.

अशा या रामभूमीत मात्र सर्व सामान्य माणसाला सार्वजनिक रस्त्यावरून वावरत असतांना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. महापालिकेच्या (Nashik Mahapalika) वतीने तयार करण्यात आलेले पदपथावर नक्की कोणाचा अधिकार आहे हाच एकमेव प्रश्न विचारला जात आहे.

पंचवटी कारंजा, मालेगाव स्टँड, इंद्रकुंड, दिंडोरी नाका(Dindori Naka), निमानी बस स्थानक (Nimani Bus Stand) अश्या मध्यवर्ती भागात काही दिवसांपासून पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांसाठी असलेल्या पदपथावर, रिक्षा चालक, स्थानिक दुकानदार, फळविक्रेते, चायनीज, किळकोळ विक्रेते आणि दुचाकींनी ताबा घेतला आहे. रस्त्यावर चालताना पादचारी नागरिकांना या पदपथाचा कुठलाही उपयोग होत नाही. स्थानिक दुकानदार आपल्या दुकानाच्या समोरील रस्ता देखील आपल्या मालकीचा असल्याचा आविर्भावात सर्वसामान्य लोकांना दमदाटी करत असल्याने वारंवार वादविवाद घडण्याचे प्रकार होत आहे.

पंचवटी परिसरातील मुख्य बाजार पेठ परिसरात अनेक दुकानदारांनीच अतिक्रमण केले आहे. दुकानासोबतच पार्किंग किंवा मोकळ्या जागेत भाडे तत्वावर अन्य छोट्या व्यावसायिकांना आपल्या मालकीची जागा असल्याचे भासवत पैसा कमविण्याचा मार्ग निवडला आहे.

पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, निमानी बस स्थानक, मालेगाव स्टँड या परिसरात लहानमोठे हॉटेल, फळविक्रेते, गॅरेज, मोबाईल विक्रेते (Mobile Seller), चायनीज दुकान, लॉटरी व्यावसायिक, मेडिकल दुकाने, चहा टपरी, विविध खाद्य पदार्थ विक्रेते असल्याने कायमच नागरिकांची वर्दळ असते. मात्र या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक ग्राहकांसाठी वाहन पार्किंगसाठी कुठलीही सुविधा नाही.

पंचवटी कारंजा, दिंडोरी नाका, निमानी बस स्थानक, मालेगाव स्टँड या भागात प्रवाशी वर्गाची कायमच वर्दळ असते मात्र प्रवाशी लोकांना (Tourists) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. या ठिकाणी रिक्षा चालक (Auto Drivers) आणि बस चालक यांच्यात कायमच वादाचे प्रसंग होत असल्याने याचा मनस्ताप सर्वसामान्य प्रवासी लोकांना होतो. तसेच रिक्षा चालकाची मनमानी, अर्वाच्य भाषा या मुळे महिला वर्गांची कुचंबणा होते.

परिसरातील अतिक्रमण (Encroachment) बाबत लोकप्रतिनिधी, महापालिका प्रशासन (NMC Administration) असो किंवा पोलीस विभाग (Police Department) सगळ्यांची उदानसीता दिसून येते.

या ठिकाणी रस्त्यावर अतिक्रमण करणारे दुकानदार यांचा लोकप्रतिनिधी, पोलीस विभाग आणि महापालिका प्रशासन मधील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या समवेत आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप वारंवार होतो मात्र या कडे सर्वच विभाग सोयीस्कर दुर्लक्ष करतात.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com