गाडी चालकाकडून दुकानदार महिलेचा विनयभंग

इंदिरानगर येथील घटना
गाडी चालकाकडून दुकानदार महिलेचा विनयभंग

इंदिरानगर | Indiranagar

दुकाना समोर पार्क केलेली गाडी (Van Park at Shop) काढण्यास सांगितली असता त्याचा राग येऊन गाडी चालकाने दुकानदार महिलेचा विनयभंग (Molestation) केल्याची घटना रामनगर परिसरात (Ramnagar) घडली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवार (दि.०५) रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विवाहित महिला दुकानात बसले असता त्यांच्या दुकानासमोर संशयित वाल्मीक गव्हाणे (Valmik Gavhane) (वय २८ रा. ईश्वरी हाइट्स, गौळाणे रोड, पाथर्डी फाटा ) यांनी त्यांची गाडी दुकानासमोर लावली.

यावेळी विवाहितेने माझे दुकान झाकले जात असून तुम्ही गाडी काढून घ्या असे सांगितले. त्याचा राग येऊन संशयित गव्हाणे याने फिर्यादी महिलेस दुचाकी ढकलून खाली पाडली, त्यांला समजवण्याचा प्रयत्न केला असता संशयित गव्हाणे यांनी महिलाच्या मनात लज्जा उत्पन्न होईल अशी कृती केली.

तसेच अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करून धमकावले. असे सुरू असताना विवाहितेने मोबाईल मध्ये शूटिंग (Mobile Shoot) काढण्याचा प्रयत्न केला. परंतु गव्हाणे बरोबर असलेल्या दोन पुरुषांनी त्यांचा मोबाईल पाडला. तसेच फिर्यादी महिलेच्या मावस बहिणीला देखील मारहाण (Beaten) करण्यात आली.

महिलेच्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Indira nagar Police Station) करण्यात आला असून वरिष्ठ पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शेख अधिक तपास करत आहेत

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com