भूमी अभिलेख कार्यालयास चपलांचा हार

भूमी अभिलेख कार्यालयास चपलांचा हार

मनमाड । प्रतिनिधी | Manmad

सतत बंद असणारे येथील भूमिअभिलेख कार्यलयाच्या (Land Records Office) विरोधात आरपीआय (RPI) ने आक्रमक भूमिका घेऊन आज बंद कार्यालयाच्या दरवाजाला चपलांचा हार घालून आंदोलन (agitation) केले.

सिटी सर्वचे कार्यालय (City Survey Office) नेहमीच बंद असतो त्यामुळे शहरा सोबत ग्रामीण भागातील (rural area) नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मनमानी करून जनतेला वेठीस धरणार्‍या आधिकर्‍यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रिपाइंचे युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, ऍड.प्रमोद अहिरे यांनी केली.

जमीन, घर, प्लॉटची खरेदी विक्रीची बारा उतारा, नकाशे, शेती संबंधित कागदपत्रे (documents) या सर्वांचा संबंध भूमिअभिलेख (सिटीसर्वे) कार्यालयाशी येत असल्यामुळे शहरापासून गाव खेड्यापर्यंत सर्वच नागरिकांना या कार्यालयात यावे लागते. मनमाडला (manmad) हे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती ठिकाण असलेले मौलाना अबुल कलाम आझाद हॉलमध्ये आहे. मात्र, हे कार्यालय नेहमीच बंद राहत असल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.

नागरिक या कार्यालयाचे उंबरठे झिजवून जातात तरी त्यांचे काम होत नाही असा आरोप रिपाईचे युवा तालुका अध्यक्ष गुरुकुमार निकाळे, एड. प्रमोद अहिरे यांनी करून आज थेट या कार्यालयाच्या बंद असलेल्या दरवाजावर चपलांचा हार घालून आगळे वेगळे आंदोलन (agitation) केले. येथे कार्यरत असलेले अधिकारी नितनवरे हे कायम मोजणीला आहे मिटिंगला आहे असे सांगुन ऑफिस बंद ठेवतात तसेच अनेक वर्षांपासून अनेकांचे प्रलंबित काम आहे तेही करण्यात येत नसल्याने जनतेला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

या मनमानी विरुद्ध आम्ही आंदोलन (agitation) केले असल्याचे निकाळे, अहिरे यांनी सांगितले आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा याहीपेक्षा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा या दोघांनी दिला. यावेळी रिपाइंचे इतर उपस्थित होते. दरम्यान मनमाड (manmad) सोबत नांदगाव (nandgaon) चे सिटी सर्वे कार्यलय देखील याच कारणामुळे चर्चेत आहे. येथील कामकाज आणि नागरिकांची होत असलेल्या गैरसोयची दखल घेऊन थेट आमदार सुहास कांदे (MLA Suhas Kande) यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागले होते.

काही महिन्या पूर्वीच येथील एका अधिकार्‍याला लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti Bribery Department) सापळा रचून हात पकडले आहे. तरी देखील भूमिअभिलेख कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी हम करे सो कायदा या प्रमाणे वागून जनतेला वेठीस धरत आहे. या कार्यालयाच्या कामकाजाबाबत लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष असून त्याचा कधीही उद्रेक होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com