दिंडोरीत आज कार्यकर्ता संवाद दौरा

दिंडोरीत आज कार्यकर्ता संवाद दौरा

वलखेड । प्रतिनिधी valkhed

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, कादवा कारखाना निवडणुकीच्या elections पार्श्वभूमीवर शिवसेना नेते खासदार संजय राऊत Shivsena Leader, MP Sanjay Raut यांच्या उपस्थितीत आज दि. 24 रोजी सायंकाळी चार वाजता संस्कृती लॉन्स, दिंडोरी येथे कार्यकर्ता संवाद दौरा होत आहे.

येणार्‍या निवडणुकीत भगवा फडकविण्यासाठी शिवसेनेची मोर्चेबांधणीस शिवसेनेने सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खा. संजय राऊत यांच्या उपस्थितीत दिंडोरी येथे कार्यकर्ता संवाद दौरा होत आहे.

प्रथमत: शिवसेना कार्यालयाचे उद्घाटन होऊन नंतर 4 वाजता संस्कृती लॉन्स येथे कार्यकर्ता संवाद दौरा होणार आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत, बाजार समिती, कादवा कारखाना याची चर्चा होणार आहे. गतवेळी काँग्रेसने जरी दिंडोरी नगरपंचायत मिळवली असली तरी नगरपंचायत निवडणूकीत शिवसैनिकांनी 17 जागा लढवण्याची मागणी केली आहे.

त्यामुळे शिवसेनेकडे येणार्‍या उमेद्वारांची संख्या पाहता खा. संजय राऊत कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे. त्यांच्यासमवेत नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी हे उपस्थित राहणार आहे. तरी शिवसैनिक शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने या कार्यकर्ता संवाद दौर्‍यास उपस्थित रहावे असे आवाहन ग्रामीण जिल्हाप्रमुख सुनील पाटील व तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com