महापालिकेवर सेनेचा भगवा फडकणार - बडगुजर

महापालिकेवर सेनेचा भगवा फडकणार - बडगुजर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे झालेल्या निर्णयामुळे समाधानाचे वातावरण असुन याच पार्श्वभूमीवर नाशिक शहरात झालेल्या कामांमुळेच सेना नेते खा. संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेवर भगवा फडकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यांच्या विश्वासातूनच आगामी निवडणुकीत महापालिकेवर भगवा फडकला जाईल, असा विश्वास शिवसेनेचे नुतन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्ध ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना नाशिक महानगर प्रमुख पदी माजी विरोधी पक्षनेते सुधाकर बडगुजर यांची नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर शहरातील सेना पदाधिकारी व शिवसैनिकात चैतन्य पसरले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. राऊत यांनी बडगुजर यांची केलेल्या नियुक्तीचा मोठा जल्लोष आज शिवसेना मध्यवर्ती कार्यालय शालीमार चौक नाशिक याठिकाणी काल सकाळी बघायला मिळाला.

महानगर सेनेच्यावतीने नुतन महानगर प्रमुख बडगुजर यांचे कार्यालयाच्या आवारात फटाके फोडत मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. याठिकाणी बडगुजर यांना कार्यकर्त्यांनी खाद्यावर घेऊन आनंद साजरा केला. यात शिवसेना नेते बबनराव घोलप, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, दत्ता गायकवाड, माजी महानगर प्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, मामा ठाकरे, सेना नगरसेवक - नगरसेविका, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

या जल्लोषानंतर स्वागत सोहळ्यानंतर मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात सत्काराला उत्तर देतांना बडगुजर म्हणाले, शहरातील सर्व प्रभागात 1 बुथ सहा युथ ही संकल्पना राबविण्यात येणार असुन याद्वारे संघटन मंजबुत केले जाणार आहे. मुंबईच्या धर्तीवर नागरिकांच्या समस्य सोडविल्या जाऊन सेना घराघरात नेण्याचे प्रयत्न पुढच्या काळात केले जाणार आहे. आगामी निवडणुकच्या माध्यमातून पुढचा महापौर सेनेचा राहणार असुन मुख्यमंत्र्यांना नाशिकचा महापौर भेट देणार असल्याचेही शेवटी बडगुजर यांनी सांगितले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com