रस्त्यांची सुधारणा करा अन्यथा...; शिवसेनेचा इशारा

रस्त्यांची सुधारणा करा अन्यथा...; शिवसेनेचा इशारा

वलखेड |प्रतिनिधी | Valkhed

दिंडोरी (Dindori) येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात (Chhatrapati Shivaji Maharaj Chowk) शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुनील पाटील (Sunil Patil) व माजी आमदार धनराज महाले (Former MLA Dhanraj Mahale) यांच्या नेतृत्वाखाली रस्त्यांच्या दुरावस्थेबद्दल प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले...

या रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात (Accident) होत असल्याने निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. तसेच शेतकऱ्यांनाही रस्त्याने (Road) मालाची वाहतूक करताना फार त्रास होतो. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात रस्त्याची सुधारणा करण्यात यावी. नाहीतर प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा माजी आमदार धनराज महाले यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेने दिला आहे.

तर जिल्हाप्रमुख सुनील पाटील, सुरेश डोखळे, तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे, डॉ. विलास देशमुख, जयराम डोखळे, यांनी आपले मनोगत व्यक्त करत तहसीलदार पंकज पवार (Tehsildar Pankaj Pawar) यांना निवेदन दिले.

दरम्यान, यावेळी उपजिल्हा संघटक सतीश देशमुख, उपजिल्हाप्रमुख कैलास पाटील, नारायण राजगुरु, अरुण गायकवाड, संगम देशमुख, प्रभाकर जाधव, गोविंद घुमरे, नदीम सय्यद, किरण कावळे, नंदू बोंबले, नदीम सय्यद, निलेश शिंदे, राजू गटकळ, अमोल कदम, उल्हास बोरस्ते, रघुनाथ आहेर, सुनील मातेरे, बाळासाहेब दिवटे, यांच्यासह आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com