विंचूरला शिवसेना कार्यकर्ता मेळावा

विंचूरला शिवसेना कार्यकर्ता मेळावा

विंचूर । वार्ताहर Vinchur

स्वार्थासाठी अनेकांनी शिवसेना ( Shivsena ) सोडली. मात्र गावपातळीवरील शिवसैनिक अद्यापही शिवसेनेतच असून शिवसैनिकांनी नव्या जोमाने कामाला लागून पक्षसंघटन अधिक मजबूत करावे, असे प्रतिपादन लासलगाव-येवला विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना संपर्कप्रमुख किशोर चव्हाण ( Kishor Chavhan- Shivsena) यांनी केले.

राज्यात घडलेल्या सत्तांतर नाट्यानंतर शिवसेनेकडून आता पक्ष मजबुतीवर भर दिला जात असून निफाड तालुक्याच्या पूर्व भागातील शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी मुंबई येथून आलेले मतदारसंघाचे संपर्कप्रमुख किशोर चव्हाण यांनी विंचूर येथे रविवारी सकाळी शिवसेनेची बैठक घेत त्यांच्याशी संवाद साधला. सामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून जि. प., पं. स., ग्रामपंचायत व विविध संस्थांवर शिवसेनेचा भगवा फडकवण्यासाठी सज्ज असल्याचे तालुकाप्रमुख प्रकाश पाटील म्हणाले

. यावेळी देवगाव, विंचूर, लासलगाव गटातील शिवसैनिक हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मरेपर्यंत शिवसैनिकच राहू, अशी शपथ घेतली. शिवसेना नेहमीच अन्यायाविरुद्ध व न्याय्य हक्कांसाठी लढत राहील, असे प्रतिपादन विंचूर शिवसेना शहरप्रमुख नानासाहेब जेऊघाले यांनी केले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख निवृत्त जगताप, भास्कर कोंढरे, बाळासाहेब जगताप, विकास रायते, बापू सोदक, शिवाजी जाधव, ज्ञानेश्वर तासकर, किशोर दरेकर, प्रमोद पाटील, बद्रीनाथ लोहारकर, प्रवीण सालगुडे, नीलेश दरेकर, बाळासाहेब शिरसाठ, दिलीप चव्हाण, बाबासाहेब चिताळकर, निरंजन शिंदे, नितीन जाधव, उत्तम वाघ, सद्दाम शेख, निवृत्ती खुळे, बाळासाहेब शिरसाठ, रविराज बोराडे, ज्ञानेश्वर पवार, उत्तम वाघ, राजाराम दरेकर, संदीप सोनवणे, बापू कुशारे, सागर गलांडे, सुमंत कारवाल, रविराज शिंदे, सचिन जोशी, राजेंद्र मोरे, किरण शिरसाठ, लहानू नाहटा, दादा वाघ, रामनाथ अस्वले, बाळासाहेब बोचरे, अविनाश देसाई, सचिन सोमवंशी आदी शिवसैनिक उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com