सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले; भागवत काराडांचा घणाघात

सत्तेसाठी शिवसेनेने हिंदुत्व सोडले; भागवत काराडांचा घणाघात

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashikroad

नेता, नीती आणि नियत चांगली असलेला भाजप (BJP) आहे. नाशिकचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी काम करू, भाजप हा जगात सर्वात मोठा पक्ष असून आमदार, खासदार, मुख्यमंत्री सर्वात जास्त आहेत. राष्ट्रहित, राष्ट्रप्रेम विचार घेऊन चालणारा पक्ष आहे....

हा पक्ष सत्तेसाठी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसणारा नाही. विधानसभा निवडणुकीत शिवसेनेने (Shivsena) हिंदुत्व सोडले. ज्या काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीला (NCP) विरोध केला त्यांनाच सत्तेसाठी जवळ केले. याला हिंदुत्व म्हणायचे का? असा सवाल केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड (Bhagwat Karad) यांनी उपस्थित केला.

येथील कदम लॉन्स येथे भाजप कार्यकर्ता मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष गिरीश पालवे (Girish Palve), राज्य चिटणीस लक्ष्मण सावजी (Laxman Savji), आ. राहुल ढिकले (Rahul Dhikle), नाशिकरोड मंडल अध्यक्ष हेमंत गायकवाड, प्रकाश घुगे, जगन पाटील, संभाजी मोरुस्कर, अंबादास पगारे, दिनकर आढाव, बाजीराव भागवत, पंडित आवारे, शरद मोरे, कोमल मेहरोलिया, मीरा हांडगे, संगिता गायकवाड, राम कदम, सुनिल आडके आदि उपस्थित होते. यावेळी कराड पुढे म्हणाले की, भाजपमध्ये कार्यकर्ता अध्यक्ष होतो. राष्ट्रवादी, काँग्रेस, सेना, मनसेना हे पक्ष घराणेशाहीवर आधारित असून त्यांच्या मर्जीनुसार चालतात. प्रास्ताविक प्रकाश घुगे यांनी केले तर सूत्रसंचालन राजेश आढाव यांनी केले.

प्रेसच्या आधुनिकीकरणाला गती मिळणार

येथील इंडिया सिक्युरिटी प्रेस (India Security Press) आणि करन्सी नोट प्रेसच्या (Currency Note Press) आधुनिकीकरणाला गती मिळणार आहे. या दोन्ही प्रेससाठी आधुनिक मशिनरी त्वरित मिळण्याचे संकेत डॉ. कराड यांनी दिले.

कराड हे नाशिकरोडला (Nashikroad) आले असता खा. हेमंत गोडसे, प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर जुंद्रे यांच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन प्रेसच्या आधुनिकीकरणाबाबत निवेदन दिले. देशातील ई पासपोर्ट बनवण्यासाठी आयएसपी प्रेस सज्ज आहे. पासपोर्ट उत्पादन अधिक अद्ययावत होण्यासाठी नवीन प्रिंटिंग मशीन व दोन फिनिशिंग मशीन मिळावे, अशी मागणी शिष्टमंडळाने कराड यांच्याकडे केली.

त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत दोन्ही प्रेसच्या आधुनिकीकरणाला गती मिळण्याचे संकेत दिले. यावेळी उपाध्यक्ष राजेश टाकेकर, कार्तिक डांगे, जयराम कोठुळे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, संतोष कटाळे, रमेश खुळे, इरफान शेख, राजू जगताप, अविनाश देवरुखकर, अशोक जाधव, योगेश कुलवदे, राहुल रामराजे, बाळासाहेब ढेरींगे, बबन सैद, रौफ शेख, शंतनु पोटिंदे, आण्णा सोनवणे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com