
नाशिक | Nashik
काही दिवसांपूवी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) हे नाशिक दौऱ्यावर आले होते. तेव्हा त्यांनी खासदार हेमंत गोडसे (MP Hemant Godse) यांनी लोकसभेला (Lok Sabha) पुन्हा निवडून येऊन दाखवावे, असे खुले आव्हान दिले होते...
त्यानंतर गोडसेंनी पत्रकार परिषद घेत राऊतांना प्रत्युत्तर दिले होते. यानंतर आज खासदार संजय राऊत हे नाशिक (Nashik) दौऱ्यावर आले असून त्यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्द्यांवर भाष्य करत खासदार हेमंत गोडसे यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.
यावेळी ते म्हणाले की, खासदार गोडसे यांनी मला लोकसभा निवडणूक (Lok Sabha Elections) लढण्याचे आव्हान देऊ नये. लोकसभेसाठी पक्ष जो उमेदवार देईल तो उमेदवार गोडसेंशी लढेल. त्यामुळे मला त्यांच्याशी लढण्याची आवश्यकता नसून ते एक मच्छर असल्याने आमचा सामान्य शिवसैनिक (Shiv Sainik) लढून त्यांचा पराभव करेल, असे संजय राऊतांनी म्हटले आहे.
तसेच पुढे ते म्हणाले की, मागच्या वेळेला खासदार गोडसेंना प्रत्येक तालुक्यातून विरोध होता. तसेच शिवसेनेतील काही प्रमुख लोकांचाही विरोध होता. मात्र, विद्यमान खासदार म्हणून त्यांना पक्षाने उमेदवारी दिली व त्यावेळी लोकांनी शिवसेनेला (Shivsena) पाहून मतदान (Voting) केल्याने गोडसे निवडून आल्याचे राऊतांनी सांगितले.