काय सांगता? नाशकात भाजपमुळे सेनेचे 'इतके' उमेदवार पडले!

काय सांगता? नाशकात भाजपमुळे सेनेचे 'इतके' उमेदवार पडले!

देवळाली कॅम्प । वार्ताहर Deolali Camp

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना युती (Shivsena BJP Alliance) असताना भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेचे ते 30 उमेदवार कपट नितीने पाडले. त्याचा बदला घेण्यासाठी शिवसैनिकांनी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज राहण्याचे आवाहन माजी मंत्री व शिवसेना उपनेते बबनराव घोलप यांनी केले... (Former Minister and Shivsena leader Babanrao Gholap)

येणाऱ्या महानगरपालिका (NMC), जिल्हापरिषद (Zilla Parishad Nashik) व पंचायत समिती (Panchayat Samiti) निवडणुकांमध्ये शिवसेनेचा भगवा ध्वज डौलाने फडकविण्यासाठी राज्यात शिव संपर्क अभियान राबविले जात आहे. देवळाली विधानसभा मतदारसंघातील ग्रामीण भागात आजही शिवसेनेचा बालेकिल्ला शाबूत आहेत मात्र काही कपटनीती मुळे पक्षाच्या उमेदवाराला पराभव स्वीकारावा लागला ही खंत शिवसैनिकांमध्ये खदखदत आहे.

ओढा (Odha) येथील शिवसैनिकांच्या मेळाव्या प्रसंगी घोलप बोलत होते . या आभियानामध्ये शिवसैनिकांच्या समस्या जाणून घेत पक्ष अधिक मजबुतीसाठी झंझावात निर्माण केला जात आहे. जाखोरी गावापासुन सुरुवात झालेल्या अभियानाचा समारोप ओढा येथे झाला.

याप्रसंगी शिवसेना उपनेते बबनराव घोलप, जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Shivsena District president Vijay Karanjkar), माजी आमदार योगेश घोलप (Shivsena leader Yogesh Gholap), उपजिल्हाप्रमुख जगन्नाथ आगळे (Jagannath Agale), अनिल ढिकले (Anil Dhikale),तालुका प्रमुख प्रकाश म्हस्के (Prakash Mhaske), संगिता खोदाणा (Sangita Khodana) आदी मान्यवर उपस्थितीत होते.

यावेळी घोलप यांनी मराठी माणसाच्या न्यायहक्कासाठी शिवसेनेचा जन्म झाला सामाजिक कामात सतत आक्रमक राहत सर्वसामान्य जनतेला शिवसेना आपलेसी वाटू लागली तीच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवुन आंदोलने करत निष्क्रिय सत्तेधारांना सोळो की पळो करून सोडले होते, मात्र सद्या शिवसेने मध्ये काही प्रमाणात मरगळ आलेली असून ती झटकने गरजेचे आहे.

जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी ठाकरे सरकारच्या योजना (Various Schemes of Thakray Government) घराघरापर्यंत पोहोचवून जनतेला दिलासा देण्याचे काम करावे व त्यातूनच आगामी सर्व प्रकारच्या निवडणुकांची तयारी करण्याचे आव्हान, केले माजी आमदार योगेश घोलप यांनी उद्धव ठाकरे यांना अपेक्षित असलेला महाराष्ट्र घडविण्यासाठी प्रत्येकाने वज्रमूठ बांधण्याची गरज असल्याचे सांगितले.

या अभियाना दरम्यान ओढा,लाखलगाव,शिलापूर व माडसांगवी या गावांनमध्ये शिवसेनाशाखा फलकाचे अनावरण करण्यात आले.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख राहुल ताजनपुरे,. लिलाबाई गायधनी, राहुल धात्रक, तुकाराम दाते, नामदेव कांडेकर, बहिरू जाधव, संगिता घुगे, नवनाथ गायधनी, दिपक गायधनी, मनीषा खांडबहाले, ज्योती भागवत,

आत्माराम दाते, विष्णूदादा पेखळे, बबलू टीळे , आशा गोडसे, लकी ढोकणे, सुभाष ढिकले, भाऊसाहेब पवार उमेश कांडेकर, संदिप धात्रक, आकाश म्हस्के, गणेश सोनवणे, तुकाराम चव्हाण, प्रमोद मोजाड आदीसह असंख्य शिवसैनिक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com