शिवसेनेच्या १८ शिबिरांत १ हजार ११४ पिशव्या रक्त संकलन

शिवसेनेच्या १८ शिबिरांत १ हजार ११४ पिशव्या रक्त संकलन

नाशिक I प्रतिनिधी I Nashik

कोरोना काळात राज्यात निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी ११०० पिशव्या रक्त संकलनाचा केलेला संकल्प 10 दिवस आधीच पूर्ण झाला हे मी माझे भाग्यच समजतो आणि यासाठी आपले सर्वस्व पणाला लावणाऱ्या शिवसैनिकांचे करावे तितके कौतुक थोडेच आहे, असे प्रतिपादन महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केले...

राणेनगरच्या श्रीकृष्ण मंदिरात युवासेना पदाधिकारी अमेय अमोल जाधव यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी बडगुजर बोलत होते.

आतापर्यंत शिवसेनेतर्फे १८ शिबिरांद्वारे १११४ पिशव्या रक्त संकलित करण्यात आले आहे. शिबिरांना प्रारंभ झाला तेव्हा १४ जूनपर्यंत ११०० पिशव्या रक्त संकलनाचे लक्ष्य आम्ही निश्चित केले होते. मात्र ४ जूनलाच हा संकल्प पूर्ण झाला. १४ जूनपर्यंत उपक्रम सुरूच राहणार असून जास्तीत जास्त पिशव्या रक्त संकलन करून आम्ही आरोग्य यंत्रणांना देऊ, असेही बडगुजर पुढे म्हणाले.

शिवसेना उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप, मनपा विरोधीपक्ष नेते अजय बोरस्ते, माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल, दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गिते, भाविसे जिल्हासंघटक वैभव ठाकरे, माजी महानगरप्रमुख सचिन मराठे, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे, स्थायी समितीचे माजी सभापती अमोल जाधव, नगरसेविका संगिता जाधव, जिल्हा कार्यालय प्रमुख राजेंद्र वाकसरे, श्रीराम गायकवाड, बालम शिरसाठ आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

अमोल चव्हाण, दीपक पंडित, राजेंद्र मिसाळ, सदाशिव सोनार, राहुल खरे, गौतम मिश्रा, सचिन मिसाळ, स्वप्निल रहाणे, निलेश वर्पे, आदित्य रंकाळे, मनिष केले, प्रणव नागपुरे, आकाश कातकाडे, सागर सांगळे, यशवंत संधान, देवदत्त मोरे, अमित कऱ्हाळे आदींसह ६० रक्तदात्यांनी रक्तदान केले.

समता रक्तपेढीचे डॉ. इरफान खान, मनज्योत सिंग, प्रगती मराठे, हंजीका खान, रहीम शहा यांचे सहकार्य लाभले. यावेळी शोभा दोंदे, संदेश एक मोडे, शैलेश कारले, राजेंद्र कदम, राजेंद्र गोर्हे, हेमंत खोडे, पी. एस. राजपूत, बाळा कार्लेकर, सहतेज महाजन, शैलेश कराळे, राजू कदम, दर्शन माळी, प्रेम बोराडे यांच्यासह शिवसैनिक मोठया संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com