भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांना पोलीस कोठडी

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांना पोलीस कोठडी

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

भाजप (BJP) कार्यालयावर दगडफेक करणार्‍या पाच शिवसैनिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने (Nashik District and Sessions Court) एक दिवसांची पोलीस कोठडी (Police custody) सुनावली आहे...

नगरसेवक दिपक दातीर (Deepak Datir) व नगरसेविका किरण दराडे (Kiran Darade) यांचे पती बाळा दराडे (Bala Darade) यांच्यासह नितीन चंद्रभान सामोरे (Nitin Samore), योगेश रामकृष्ण चुंबळे (Yogesh Chumble) किशोर साळवे (Kishor Salve) अशी पोलीस कोठडी सुनावलेल्यांची नावे आहेत.

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्यांना पोलीस कोठडी
नाशकात शिवसैनिकांनी भाजपचे कार्यालय फोडले; मोठा पोलीस बंदोबस्त

भाजप कार्यालयावर दगडफेक करुन मुंबईत (Mumbai) फरार झालेले नगरसेवक दीपक दातीर व नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांच्यासह नितीन चंद्रभान सामोरे, योगेश रामकृष्ण चुंबळे किशोर साळवे हे शनिवारी (दि.28) गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात हजर झाले. गुन्हे शाखेने त्यांना भद्रकाली पोलिसांच्या (Bhadrakali Police) ताब्यात दिले.

भाजप कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर ते फरार झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे शनिवारी (दि.२८) प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. त्यावेळी हे दोघेही खासदार राऊत यांच्या पाठीमागे दिसून आले.

यानंतर नगरसेवक दातीर आणि बाळा दराडे हे पोलिसांना शरण आले. मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच शिवसैनिकांना ताब्यात घेत भद्रकाली पोलीस ठाण्यात (Bhadrakali Police Station) गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या ताब्यात दिले. रविवारी भद्रकाली पोलिसांनी त्यांना न्यायालयात (Court) हजर केले. न्यायालयाने पाच जणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com