शिवसेनेचे भगवे वादळ झेपावतेय

शिवसेनेचे भगवे वादळ झेपावतेय

नाशिक | रवींद्र केडिया

राजकीय महत्त्वाकांक्षांच्या बळावर सुंदोपसुंदीत अडकलेल्या शिवसेनेने (Shivsena) पुन्हा नव्या दमाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. जुन्या पदाधिकार्‍यांच्या बेदिलीवर मलमपट्टी करून शिवसेनेने पदाधिकार्‍यांची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे...

मनपावर (Nashik NMC) भगवा फडकवण्याचा निर्धार करत शिवसेना पुन्हा जोमात कामाला लागल्याचे दिसून येत आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हे नाशिककडे शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून पहात होते. कालांतराने शिवसेनेचा विस्तार होत गेला. निवडणुकांमध्ये (Elections) सुरू झालेल्या पक्षांतर्गत रस्सीखेचीतून एकजीवाने कार्य करणार्‍या कार्यकर्त्यांमध्ये बेदिली निर्माण झाल्या. त्यातून पक्षांतरही झाले.

मात्र राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी पक्ष संघटना बांधणीवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. परिणामी पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांची दिलजमाई करण्याची विशेष मोहीम हाती घेण्यात आली. त्यात विविध पक्षांत स्थलांतरीत झालेले ज्येष्ठ पदाधिकारी स्वगृहीदेखील परतले.

या माध्यमातून पक्ष संघटन बांधणीवर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांत खा. संजय राऊत यांच्या नाशिकच्या फेर्‍या वाढल्या आहेत. स्वत: मुख्यमंत्र्यांनी नाशिकचा दौरा करून कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांना एकजीव करण्यावर विशेष लक्ष दिल्याचे दिसून आले. यामुळे कार्यकर्त्यांमधील बेदिली संपवण्याचे सांगत एकदिलाने कामाला लागण्याचा संदेश दिला होता.

आज शिवसेनेने संघटनात्मक कामाला गती दिल्याचे दिसून येत आहे. महिला विभागासाठी विशेष उपक्रम हाती घेत त्यांचीदेखील संघटनात्मक बांधणी करून नव्या जनसंपर्काला गती देण्यात येत आहे. वॉर्डनिहाय कार्यक्रमांतून कार्यकर्त्यांचे जाळे विणण्याचे काम केले जात आहे. त्यातून शिवसेनेला ऊर्जा मिळत असल्याचे चित्र आहे.

वॉर्डनिहाय बांधणी

शिवसेना पूर्वी दोन गटात विखुरलली होती. गेल्या काही दिवसात शिवसेनेने या दोनही गटांना एकत्र करून त्यांच्या संयुक्त कार्यक्रमांची आखणी केल्याचे दिसून येते. वॉर्ड एकचा की दोनचा हा विषय अलहिदा मानत शिवसेना वॉर्डनिहाय मोट बांधणी करत आहे. महिला विभागाच्या कार्यकर्त्याची स्वतंत्र्य फळी तयार करण्यात येत आहे. त्या माध्यमातून वॉर्डावॉर्डात कार्यकर्त्यांची फळी निर्माण करण्यात येत आहे.

भाजप-सेना वादातून बांधणी घट्ट

मध्यंतरी शिवसेना व भाजप नेत्यांच्या वक्तव्यावरून शहरातून पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्या माध्यमातून शहर व जिल्हाभरात मोठे वादळ उभे राहिले होते. त्यातून संघटनेची बांधणी जास्त घट्ट करण्यात नेत्यांना यश आल्याचे दिसून आले. गल्लीगल्लीतील कार्यकर्ते त्वेशाने पेटून उठल्याचे त्यातून दिसून आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com