देवळा | तालुका विशेष प्रतिनिधी

केंद्र शासनाने केलेल्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ देवळा येथे शिवसेनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येऊन पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले...

पेट्रोल व डिझेलचे भाव गगनाला भिडत असताना केंद्र शासन बघ्याची भूमिका घेत असल्याने केंद्र शासनाच्या निषेध करण्यासाठी शिवसेनेच्या वतीने देवळा, पाच कंदील येथे रास्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

करोनामुळे प्रातिनिधिक स्वरूपात मोजक्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या वतीने दुपारी १२ वाजता पाच कंदील येथे रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी विंचूर-प्रकाशा मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. यावेळी पोलीस निरीक्षक सुहास देशमुख यांना निवेदन देण्यात आले.

रास्ता रोकोत शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुनील पवार, माजी तालुकाप्रमुख देवानंद वाघ, शहरप्रमुख मनोज आहेर, विभागप्रमुख विजय जगताप, नंदकुमार जाधव, भारत देवरे,उपशहरप्रमुख विश्वनाथ गुंजाळ, देवा चव्हाण, विशाल आहेर,भास्कर पवार, आबा बोरसे, जितेंद्र भामरे, सतीश आहेर, भाऊसाहेब चव्हाण, रामदास पवार, संतोष पवार, राकेश हेमबाडे, दीपक देवरे, कौतिक निकम, जीभाऊ पवार,संजय आहेर आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.