नाशकात शिवसैनिक आक्रमक; रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नाशकात शिवसैनिक आक्रमक; रामदास कदमांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला

नशिक | Nashik

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंविषयी (Uddhav Thackeray) शिंदे गटाचे (Shinde Group) नेते रामदास कदमांनी (Ramdas Kadam) रत्नागिरीमधील (Ratnagiri) दापोली (Dapoli) येथील जाहीर सभेत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्याचे पडसाद आज नाशिकमध्येही (Nashik) उमटल्याचे पाहायला मिळाले.

रामदास कदमांनी दापोली येथील सभेत उद्धव ठाकरेंवर टीका करतांना मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, असे म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्यावरून राज्यभरातील शिवसैनिक (ShivSainik) संतप्त झाले आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत. असेही ते म्हणाले होते.

तसेच कदमांच्या याच वक्तव्याच्या निषेधार्थ आज शहरातील शालीमार (Shalimar) येथील शिवसेना कार्यालयासमोर (ShivSena office) शिवसैनिकांनी रामदास कदम यांचा प्रतिकात्मक पुतळा (Statue) जाळत निषेध नोंदवला.

दरम्यान, यावेळी जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) माजी आमदार वसंत गीते (Vasant Geete) माजी नगरसेवक अजय बोरस्ते, विलास शिंदे, शिवसेना नेते सुनील बागुल यांच्यासह आदी शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com