ऐतिहासिक पाऊलखुणा जोपासण्याचा वसा

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची रामशेजवर श्रमदान मोहीम
ऐतिहासिक पाऊलखुणा जोपासण्याचा वसा

देवळाली कॅम्प | वार्ताहर | Deolali Camp

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची (Shivkarya Gadkot Samvardhan Sanstha)152 वी मुक्कामी अखंडित दुर्गसंवर्धन मोहीम अजिंक्य दुर्ग रामशेजवर (Ramshej) झाली. या मोहिमेत किल्ल्याच्या दुसर्‍या टप्प्यातील भवानी मंदिराच्या उत्तरेस असलेल्या 60 बाय 12 (फूट) आकाराचे व दुसरे 15 बाय 20 आकाराचे असे दोन मातीत बुजलेले, नष्ट होण्याच्या स्थितीतील सैनिकांच्या घरांचे जोते यांच्यातील काटेरी झुडपे काढून त्यांना मातीचा भराव टाकण्यात आला. या ऐतिहासिक पाऊलखुणांना जोपासण्याचे काम अभ्यासात्मक श्रमदानातून करण्यात आले...

दरम्यान मानवी कृत्य असलेले व असुरक्षित रामशेजवर (Rameshej) दरवर्षी लागणारे वणवे यावर वनविभागाने (Forest Department) किल्ल्यावर जाणार्‍या येणार्‍यांची नोंदणी कक्ष पायथ्याशी उभारावा, किल्ल्यावरील काही हुल्लडबाज धिंगाने करतात त्यांना आळा घालावा, किल्ला प्लॅस्टिकमुक्त करावा, किल्ल्याची पूर्व बाजूस होणारी झीज रोखावी, त्याची कारणे शोधावी ही मागणी वनविभाग पूर्व व दिंडोरी पोलीस यंत्रणा यांना वारंवार केली आहे, पुन्हा करीत आहोत, अशी मागणी शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ (Ram Khurdal) यांनी केली.

गेले 21 वर्षे नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) गडकिल्ले, बारवा, ज्ञात अज्ञात समाध्या, विरगळी यांचे संवर्धन करणार्‍या, दुर्गजागृतीद्वारे ऐतिहासिक पाऊलखुणा समाजात दुर्गव्याख्याने, पोस्टर नाटिकेद्वारे नेणार्‍या शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची अखंडित मुक्कामी मोहीम रामशेज किल्ल्यावर झाली.

उंचीने कमी पण कातिव कड्याने अभेद्य रामशेज छत्रपती संभाजी राजेंच्या मावळ्यांच्या अजिंक्य शौर्य पराक्रमाची भूमी आहे. या किल्ल्याच्या अनेक वास्तूंची दशा दूर करण्यासाठी मातीत, झुडपांत, भग्न झालेल्या इतिहासाच्या पाऊलखुणा संवर्धन, पर्यावरण जतन जोपासण्याचे, शोधण्याचे काम शिवकार्य गडकोट संवर्धन संस्था अखंडित करीत आहे.

या मोहिमेत माथ्यावर लावलेल्या काटेसाबर, फुले, चाफ्याच्या झाडांना पाणी घालून नष्ट होणार्‍या दोन जोत्याना जीवदान देण्यात आले. यावेळी पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास व वास्तविक स्थितीची जागृती करण्यात आली.

या श्रमदान मोहिमेत संकेत नेवकर, भूषण औटे, रोहित गटकळ, जयराम बदादे, किरण दांडगे, भारत पिंगळे, शिवाजी धोंडगे, तुषार पिंगळे, सागर शेलार, आशिष प्रजापती, विजय थेटे, संदीप थोरात आदींनी सहभाग घेतला होता.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com