
नाशिकरोड | प्रतिनिधी| NashikRoad
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वेळोवेळी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांना राज्यपाल पदावरून हटविण्यात यावे या मागणीसाठी नाशिकरोड येथील शिवजन्मोत्सव समितीच्या (Shivjanmotsav Committee) वतीने राष्ट्रपतींना (President) हजारो पोस्ट कार्ड पाठविण्यात येत असून आत्तापर्यंत सुमारे एक हजाराहून अधिक नागरिकांनी सदरचे पोस्ट कार्ड पाठविले आहे.
येथील छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) चौकात सदरचा उपक्रम शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने राबविण्यात येत आहे. सकाळपासूनच या मोहिमेला नागरिकांनी (Citizens) उस्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी काळ्या किती लावून राज्यपाल कोश्यारी यांचा निषेध केला.
दरम्यान, याप्रसंगी शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष किशोर जाचक, बंटी भागवत, राजेश फोकने, नितीन चिडे, संतोष क्षीरसागर, अतुल धोंगडे, श्याम गोहाड, विश्वास लवटे, श्रीकांत मगर, शिवाजी हंडोरे, किरण डहाळे,चंदू महानुभव, नितीन खरजुल, रामभाऊ जगताप, विक्रम कोठुळे, योगेश भोर आदी उपस्थित होते.