नवीन नाशकात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

नवीन नाशकात शिवभोजन थाळीचा शुभारंभ

नवीन नाशिक | प्रतिनिधी

नवीन नाशकातील गोरगरिबांना मोफत भोजन उपलब्ध करून द्यावे या उद्दशाने महाविकास आघाडीतर्फे दुर्गानगर स्टॉप येथे शिवभोजन थाळीचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.

शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना महाले व दिलीप खैरे आदींच्या प्रमुख उपस्थितीत आज या थाळीचा शुभारंभ करण्यात आला.

करोनाच्या काळात लॉकडाऊनमुळे गोरगरिबांचे अन्नावाचून हाल होऊ नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने दहा रुपयांची असलेली शिव भोजनथाळी मोफत पुरविण्याचा निर्णय घेतल्याने हजारो गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.

नवीन नाशकात सुरू झालेल्या या उपक्रमाच परिसरातील जास्तीतजास्त गोरगरीब त्याचा लाभ घेऊ शकतील,असा विश्वास शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला.

पहिल्या दिवशी 100 हून अधिक गरिबांना पार्सल स्वरूपात शिवभोजन थाळीचे वितरण करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादीचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष , बाळासाहेब गीते, विभागीय अध्यक्ष मकरंद सोमवंशी, बाळासाहेब कर्डक शिवसेना विभाग प्रमुख पवन मटाले आदींसह मान्यवर उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com