शिवार जलमय, पूल पाण्याखाली, अनेक मार्ग बंद

शिवार जलमय, पूल पाण्याखाली, अनेक मार्ग बंद

निफाड । प्रतिनिधी | Niphad

गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे (heavy rain) अवघा शिवार जलमय झाला असून

अतिपाण्यामुळे पिके सडू लागली आहेत; तर पुराचे पाणी नदीकाठच्या शेतात शिरल्याने ही पिकेदेखील वाया जाणार आहे. पुराची भीषणता विचारात घेऊन नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत असून चांदोरी (chandori), सायखेडा (Saykheda) परिसरात आपत्ती व्यवस्थापन टीम (Disaster Management Team) तैनात करण्यात आली आहे.

गोदावरी (goadvari), दारणा (darna), पालखेड (palkhed), गंगापूर (gangapur dam) धरणातून पाणी सोडण्यात आल्याने नद्यांना पूर आला आहे. साहजिकच नांदूरमध्यमेश्वरसह कानळदच्या पुलावरून पाणी वाहत असून सायखेडा, करंजगाव पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. अतिवृष्टीने (heavy rain) पिकांचे मोठे नुकसान झाल्याने या नुकसानीचे पंचनामे (panchanama) करण्याची मागणी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिंडोरी (dindori), इगतपुरी (igatpuri) तालुक्यातील धरणामधून पाण्याचा विसर्ग (water discharge) वाढविण्यात येत असल्याने गोदाकाठला पुरपरिस्थिती तयार झाली आहे.

सद्यस्थितीत पालखेड धरणातून 29420 क्युसेक, दारणा धरणातून 15000 क्युसेक, गंगापूर धरणातून 12671 क्युसेक तर कडवा धरणातून 3517 क्युसेक पाणी सोडण्यात आल्याने हे सर्व पाणी नांदूरमध्यमेश्वर धरणात जमा होत असल्याने तसेच परिसरातील छोट्या-मोठ्या नद्या व पावसाचे पाणी देखील नांदूरमध्यमेश्वर धरणात येत असल्याने मंगळवार दि.12 रोजी सायंकाळी 6 वाजता नांदूरमध्यमेश्वर धरणातून 79848 क्युसेकने विसर्ग करण्यात येत आहे.

साहजिकच सुरत (surat), निफाड (niphad), सिन्नर (sinnar), घोटी (ghoti) या राज्य क्रं.23 वरील नांंदूरमध्यमेश्वर (Nandurmadhyameshwar) जवळील गोदावरी नदीवरील (godavari river) पुलावरून पाणी वाहत असल्याने सोमवारी सायंकाळपासून हा मार्ग खंडित झाला आहे. तर सायखेडा पुलाजवळ मोठ्या प्रमाणात पानवेली अडकल्याने जे.सी.बी च्या सहाय्याने या पानवेली काढण्यात येत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सायखेडा व करंजगाव, कोठुरे आणि कानळद हे पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. तर खेडलेझुंगे ते ब्राम्हणवाडे दरम्यानच्या पुलावरून अद्यापही वाहतूक सुरू आहे.

सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब पडल्याने व काही ट्रान्सफार्मर पाण्यात असल्याने अशा ठिकाणचा वीजपुरवठा बंद (Power off) करण्यात आला आहे. चांदोरीचे ग्रामदैवत खंडेराव मंदिर पाण्यात बुडाले असून निफाडच्या संगमेश्वर मंदिराला पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. तर काथरगावचे संगमेश्वर मंदिर पुराच्या पाण्यात गडप झाले आहे. काथरगाव, गोंडेगाव, शिंगवे, नांदूरमध्यमेश्वर, शिवरे, कुरूडगाव, सायखेडा, चाटोरी, चांदोरी आदी गावातील नदीकाठच्या पिकामध्ये पुराचे पाणी शिरले आहे.

त्यामुळे ही संपूर्ण पिके आता वाया जाणार आहेत. सायखेडा-नाशिक या सिटी बससेवेसह लासलगाव-सिन्नर, लासलगाव-पुणे या गोदाकाठ भागातून धावणार्‍या बसगाड्या बंद करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने तालुक्यात दोन दिवस रेड अ‍ॅलर्ट जाहिर केल्याने शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील पानवेली काढण्याची मागणी वारंवार करण्यात येवूनही पाटबंधारे विभागाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आता याच पानवेली पुलाला अडकून पुराचे पाणी शेतात घुसत आहे.

तसेच याच पानवेलींमुळे पुलांना धोका तयार झाला आहे. तसेच हातात आलेली पिके वाया गेल्याने महसूल विभागाने पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे सुरू करून शेतकर्‍यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी होत आहे.

दोनशे एकर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली

देवगाव-कानळद रस्त्याच्या कडेला चराचे काम अपूर्णावस्थेत असल्याने देवगाव, कोळगाव, कानळद शिवारातील जवळपास 200 एकर क्षेत्रावरील सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. त्यामुळे केवळ एका शेतकर्‍यामुळे या सर्व शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. चराचे काम व्हावे यासाठी तहसीलदार, पोलीस निरीक्षक, पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांनी भेटी देवून देखील अद्यापपर्यंत कुठलीही कार्यवाही झाली नसल्याचे कानळदचे माजी सरपंच शिवाजी सुपनर यांनी म्हटले आहे.

आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज

ग्रामपंचायत चांदोरी येथे पूरपरिस्थिती नियंत्रणासाठी जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिलेल्या निर्देशानुसार पं.स. चे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी प्रत्यक्ष पूरस्थितीची पाहणी करून खालीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येत आहे. नदी परिसरातील गावाच्या गावठाणमळे पुरामुळे बाधित ठिकाणांमधील सुमारे 430 कुटुंबामधून साधारणपणे 2150 लोकसंख्या बाधित होऊ शकते.

त्यामुळे त्यांना स्थलांतर करण्यासाठी आवश्यक वाटल्यास ग्रामपंचायतीमार्फत श्रीराम जानकी लॉन्स येथे 650 नागरिक तसेच मारुती मंदिर येथे 225 नागरिक, गोदावरी सोसायटी हॉल मध्ये 450 नागरिक, हिंगणे वाडा येथे 150 नागरिक, काकाश्री लॉन्स येथे 450 नागरिक व नागापूर मारुती मंदिर येथे 350 नागरिकांना राहण्यासाठी व्यवस्था करून ठेवण्यात आली आहे.

तसेच चांदोरी परिसरात आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज असून ग्रामपंचायतमार्फत ट्रॅक्टरद्वारे पाणी टँकर व पूर नियंत्रणाबाबत आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र अद्याप पूरपरिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी देखील सतर्क राहात पूरपरिस्थितीत नदीलगतच्या परिसरात न जाता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जि.प. च्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पं.स. चे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com