भाविकांसाठी शिवालय तलाव बंद

भाविकांसाठी शिवालय तलाव बंद

सप्तशृंगीगड । वार्ताहर Saptshrungi Gad

सप्तशृंगीगडावर देवीदर्शन सुरू झाले असले तरी येथील शिवालय तलाव Shivalaya lake कोजागिरी पौर्णिमेपर्यंत भाविकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत. त्यामुळे शिवालय तलाव परिसर बॅरिकेडिंग करून बंद करण्यात आला होता.

जिल्हाधिकार्‍यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ट्रस्ट, ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांना करोना संक्रमणविषयक मार्गदर्शन करण्यात आले. सप्तशृंगी गडावरील शिवालय तलाव येथे स्नान करून मंदिरात भाविक जाण्याची वर्षानुवर्षांपासून चालत आलेली प्रथा आहे.

मात्र शिवालय तलाव येथे अनेक भाविक स्नान करतील म्हणून करोनाचे संक्रमण corona होण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी शिवालय तलाव क्षेत्र बेरीकेडस् लावून बंद करण्यात आले आहे. यासाठी सप्तशृंगी गडावर दर्शनाला येणार्‍या भाविकांनी शासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.