
नाशिक | Nashik
महाशिवरात्रीनिमित्त (Mahashivratri) राज्यभरातील शिवमंदिरे भाविकांच्या (Devotees) गर्दीने गजबजली आहेत. तब्बल दोन वर्षांनंतर महाशिवरात्री मोठ्या उत्साहात साजरी होत असल्याने राज्यभरातील शिवमंदिरांत भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. तसाच उत्साह नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) शिवमंदिरांमध्ये दिसत आहे.
बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग (Trimbakeshwar Jyotirlinga) आज महाशिवरात्रीनिमित्त भाविकांच्या गर्दीने (Crowded) फुलून गेले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिर हे महाशिवरात्रीनिमित्त कालपासूनच भाविकांसाठी २४ तास खुले ठेवण्यात आले आहे. त्यामुळे भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येत आहे. तसेच महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
तर महाशिवरात्रीच्या आदल्या दिवशीच भाविक दर्शनासाठी मंदिरात हजर झाले होते. त्यामुळे पहाटेपासून भक्तांच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. यामुळे शिवभक्तांच्या प्रचंड गर्दीने त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली आहे. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे (Programs) आयोजन करण्यात आले आहे.
दरम्यान, त्याबरोबरच नाशिकच्या कपालेश्वर मंदिरात (Kapaleshwar Temple) देखील आज पहाटेपासून भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. मंदिर प्रशासनाने पहाटे चार वाजेपासून रात्री १२ वाजेपर्यंत मंदिर भविकांना दर्शनासाठी खुले ठेवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तर सायंकाळी ४ वाजता कपालेश्वराची पालखी काढण्यात येणार आहे.