जिल्हा शल्यचिकित्सकांना शिवसेनेचे निवेदन

रुग्णालयातील गैरप्रकार थांबवा
जिल्हा शल्यचिकित्सकांना शिवसेनेचे निवेदन

मुंजवाड । वार्ताहर Munjvad

शहरातील ग्रामीण रुग्णालयात ( Rural Hospital ) अनागोंदी कारभार सुरु असुन येथील वैद्यकीय अधिकारी परिचारिका, कर्मचारी, नेमून दिलेल्या नोकरीच्या वेळेत हजर रहात नसल्याने रुग्णांची हेळसांड होत आहे. रुग्णांना खासगी रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले जाते. या बाबींना आळा बसवावा अशी मागणी शिवसेनेतर्फे ( Shivsena )करण्यात आली आहे.

अल्पवयीन तरुणीचा अवैधरित्या गर्भपात करण्यात आल्याच्या घटनेने चर्चेत आलेल्या सटाणा ग्रामीण रुग्णालयास ( Satana Rural Hospital ) जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी भेट देत पाहणी केली. यावेळी शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, माजी शहरप्रमुख शरद शेवाळे, उपशहरप्रमुख राजनसिंग चौधरी, मंगलसिंग जोहरी, सचिन सोनवणे, माजी तालुकाप्रमुख वंसत सोनवणे, उपशहरप्रमुख बापु कर्डीवाल, सुनील पाटील, पप्पू शेवाळे, सुरेश पगार, निरंजन बोरसे, आदीच्या शिष्टमंडळाने ग्रामीण रुग्णालयात जाऊन डॉ. थोरात यांची भेट घेतली ग्रामीण रुग्णालयात गोरगरीब जनतेला येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी याच्यांकडुन रुग्णांना कोणत्याही प्रकारच्या आरोग्य सुविधा मिळत नसून उलट कमचार्‍यांकडून रुग्णांना व नातेवाईकांना अरेरावीची भाषा वापरली जात असल्याचा आरोप शिवसेना पदाधिकार्‍यांतर्फे केला गेला.

अपघात, प्रसूती साठी आलेल्या महिला, विषप्राशन केलेले रुग्ण, सर्पदोष आदी रुग्णांना ग्रामीण रुग्णालयात उपचार न करता त्यांना खासगी रुग्णालयात अथवा मालेगाव, नाशिक येथे जाण्याचा सल्ला दिला जातो शासकीय रुग्णवाहिका असतानाही चालक नसल्याचे सांगुन खाजगी रुग्णवाहिका करण्यास रूग्णांना सांगितले जाते, असे प्रकार सुरू असल्याचा पाढा शिवसेना पदाधिकार्‍यांनी डॉ. थोरात याच्यां समोर मांडला या प्रकारांना त्वरीत आळा न बसल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी दिला.शिवसेनेने दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन रुग्णालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना सुचना करुन या पुढे रुग्णांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल अशी ग्वाही डॉ. थोरात यांनी शिष्टमंडळास दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com