12 जुलैपासून शिवसंपर्क अभियान

12 जुलैपासून शिवसंपर्क अभियान

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या तसेच नगरपरिषदांच्या निवडणुकीत सर्वत्र शिवसेनेची (Shivsena) एकहाती सत्ता आणण्यासाठी शिवसैनिकांनी आतापासूनच दक्ष राहावे आणि शिवसंपर्क अभियानाद्वारे (Shiv Sampark Abhiyan) घरोघरी जाऊन महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi government) राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर (Vijay Karanjkar) यांनी केले...

शिवसेनेतर्फे दि. १२ ते २४ जुलैपर्यंत शिवसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे. त्याच्या पूर्व तयारीसाठी शालिमार (Shalimar) येथील मध्यवर्ती कार्यालयात (Central Office) आयोजित करण्यात आलेल्या नाशिक लोकसभा मतदारसंघातील शहरी व ग्रामीण पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना करंजकर बोलत होते.

राज्यात शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर असल्याने तसेच या सरकारने आतापर्यंत घेतलेले लोकोपयोगी आणि धाडसी निर्णयांमुळे जनता समाधानी आहे. त्याचा लाभ घेऊन आगामी सर्व निवडणुकांत सर्वत्र शिवसेनेचा भागवाच दिसेल यादृष्टीने पावले उचलूया, असे महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी सांगितले.

सर्वांनी मनापासून प्रयत्न केल्यास आणि शिवसेनेची एकहाती सत्ता आणण्याचा ध्यास घेतल्यास आपण सर्व निवडणुका सहजगत्या जिंकू शकतो, असे माजी आमदार वसंत गिते (Vasant Gite) व माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड (Datta Gaikwad) यांनी सांगितले.

व्यासपीठावर माजी महापौर विनायक पांडे, मनपा गटनेते विलास शिंदे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जगन आगळे, दीपक खुळे, उपजिल्हाप्रमुख निवृत्ती जाधव, जगनराव आगळे, दीपक खुळे आदी पदाधिकारी होते.

बैठकीस शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, हरिभाऊ गायकर, सोमनाथ तुपे, भगवान आडोळे, विष्णू वारुंगसे, संपत चव्हाण, माजी आमदार काशिनाथ मेंगाळ, सिन्नरचे उपनगराध्यक्ष किरण डगळे, उदय सांगळे, जि प सदस्य काऊजी ठाकरे, संजय सानप, हरिदास लोहकरे, नीलेश केदार, समाधान बोडके, पं.स.सभापती सोमनाथ जोशी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com