रक्तदान शिबिरासाठी शिवसेनेचा पुढाकार

रक्तदान शिबिरासाठी शिवसेनेचा पुढाकार

आगामी पंधरवड्यात आणखी 7 रक्तदान शिबिरांचे आयोजन

नाशिक। प्रतीनिधी

करोनाच्या संकट काळात रुग्णांना मोठ्याप्रमाणात रक्तसाठा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेने पावले उचलली असून आगामी पंधरवड्यात आणखी सात ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिली.

नाशिक महानगर शिवसेनेने विविध ठिकाणी आयोजित केलेल्या शिबिरांद्वारे आतापर्यंत 650 पिशव्या रक्त संकलित करुन दिले आहे.परंतु रक्ताची आणखी मोठ्या प्रमाणात गरज लागणार असल्याने राष्ट्रीय कार्यात योगदान देण्यासाठी आगामी पंधरवड्यात 7 ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे,असे बडगुजर पुढे म्हणाले.

27 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत सिद्धिविनायक मंदिर (पंचवटी) येथे हे शिबिर होईल.शैलेश सूर्यवंशी, महेंद्र बडवे, सुनील निरगुडे हे आयोजक आहेत.

28 मे रोजी सकाळी 11 ते दुपारी 4 पर्यंत नासिकरोड येथे मुक्तिधामजवळ शिबिर होईल. युवासेना पदाधिकारी आकाश उगले हे त्याचे आयोजक आहेत.

29 मे रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत पाथर्डी फाटा (टोयाटो शोरूम जवळ) हे शिबिर होईल. युवासेना पदाधिकारी बाळकृष्ण शिरसाट हे शिबिराचे आयोजक आहेत.

30 मे रोजी नाशिकरोडला पिंटू कॉलनी (जेलरोड) येथे सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत शिबिर होईल.शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी त्याचे आयोजन केले आहे.

2 जून रोजी हिरावाडी(पंचवटी) येथे सकाळी 10 ते दुपारी 4 पर्यंत शिबीर होणार असून शिवसेना पदाधिकारी दिगंबर मोगरे यांनी त्याचे आयोजन केले आहे.

5 जूनला सकाळी 10 ते दुपारी 3 पर्यंत अतुल डेअरी (सिडको) येथे शिबिर होणार असून त्याचे आयोजन युवासेना पदाधिकारी प्रवीण चव्हाण,प्रतीक तिवारी यांनी केले आहे.

12 जूनला अंबिका स्विट अशोकनगरचौक सातपूर येथे सकाळी 10 ते दुपारी 2 पर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आसून शिवसेना पदाधिकारी देवा जाधव समाधान देवरे हे आयोक आहे.

वरील सर्व रक्तदान शिबिरांच्या कार्यक्रमास उपनेते माजी मंत्री बबनराव घोलप,जिल्हाप्रमुख विजय करंजकर,खा. हेमंत गोडसे,मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते,माजी जिल्हाप्रमुख सुनील बागूल,दत्ता गायकवाड, माजी आमदार वसंत गीते,माजी महापौर विनायक पांडे,मनपा गटनेते विलास शिंदे,युवसेना जिल्हाधिकारी दीपक दातीर, राहुल ताजनपुरे,भारतीय विद्यार्थी सेना जिल्हा संघटक वैभव ठाकरे, युवासेना जिल्हा चिटणीस गणेश बर्वे आदींची प्रमुख उपस्थिती असेल,असेही बडगुजर यांनी नमूद केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com