पोरक्या चिमुकल्यांना मदतीचा हात

पोरक्या चिमुकल्यांना मदतीचा हात

मोखाडा | Mokhada

तालुक्यातील साखरी (Sakhari) येथील ललिता वाघ (45) (Lalita Wagh) या कातकरी महिलेचे पाच महिन्याचे बाळ असताना तिचा मृत्यू झाला. यानंतर गेल्या वर्षभरापासून तिची मुलगी कल्पना सवरा (Kalpana Savra) ही त्या बाळाचा सांभाळ करत होती...

परंतु दुर्दैवाने प्रसूती दरम्यान तिचादेखील एका महिन्याभरापूर्वी मृत्यू झाला. सुदैवाने तिचे बाळ वाचले. परंतु या दोन्ही बालकांना नियतीच्या खेळाने त्यांच्या आईपासून दूर केल्याने त्यांचे जगणे अवघड झाले आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून त्यांचा मामा मंगेश वाघ (Mangesh Wagh) हा सहा महिन्यांचा कार्तिक, दीड वर्षांचा गुरुनाथ यांचा सांभाळ करत होता. परंतु त्यालादेखील सात महिन्यांची मुलगी आहे. त्यांची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याला अधिक दिवस या मुलांचा सांभाळ करणे शक्य होत नव्हते.

यामुळे गेल्या काही दिवस कार्तिकचे वडील या दोन्ही मुलांचा सांभाळ करत होते. यानंतर सुनिल सवरा याचा भाऊ कार्तिक सवरा हा गेल्या आठवड्याभरापासून या मुलांचा सांभाळ करीत आहे.

या लहानग्यांचे पालन, पोषण कसे करायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर येऊन ठाकला. यामुळे शिवसेनेने सामजिक बांधिलकी जपत मदतीचा हात पुढे केला आहे. स्वातंत्र्यदिन (Independence Day) व पालघर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आ. रवींद्र फाटक (Ravindra Phatak) यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत या कुटूंबियांना दोन महिने पुरेल इतके किराणा साहित्य देण्यात आले.

तसेच तालुका प्रमुख अमोल पाटील (Amol Patil) यांनी रोख` स्वरूपात मदत केली. या चिमुकल्यांना भविष्यात कोणतीही मदत लागल्यास शिवसेना (Shiv Sena) पक्ष कटिबद्ध राहील, असे प्रकाश निकम (Prakash Nikam) यांनी सांगितले.

यावेळी मोखाडा पंचायत समितीच्या सभापती सारिका निकम, तालुका प्रमुख अमोल पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, स्थानिक कार्यकर्ते व शिवसैनिक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com