शहीद जवानाच्या कुटुंबीयांसोबत शिवसेनेची भाऊबीज

शहीद जवानाच्या कुटुंबीयांसोबत शिवसेनेची भाऊबीज

येवला | प्रतिनिधी | Yeola

धुळगाव (Dhulgaon) येथील वीर जवान सचिन भिमराज गायकवाड (Sachin Gaikwad) हे लष्करात आपली देशसेवा बजावत असताना दि. २ ऑक्टोबर २०२१ रोजी शहीद झाले. त्यामुळे गायकवाड कुटुंबीयांनी यंदाची दिवाळी (Diwali) साजरी केली नाही...

शिवसेनेच्या (Shivsena) वतीने येवला तालुका प्रमुख रतन बोरणारे यांनी या परिवाराची भेट घेऊन शहीद जवान सचिन गायकवाड यांच्या पत्नी व आई यांना पैठणी भेट देऊन या कुटुंबीयांसमवेत भाऊबीज (Bhaubij) साजरी केली.

शहीद जवान सचिन गायकवाड यांच्या कुटुंबात दोन वर्ष व चार वर्षाची मुलगी, आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. आपल्या घरातील तरुण मुलगा शहीद झाल्याने संपूर्ण कुटुंब आजही सचिनच्या आठवणीने भावनाविवश होऊन रडत आहेत. या कुटुंबाला आधार देऊन शिवसेनेच्या वतीने संपूर्ण परिवाराला नवीन कपडे मिठाई व फळे वाटप करून दिवाळी भाऊबीज साजरी करण्यात आली.

यावेळी उप तालुका प्रमुख पुंडलिक पाचपुते, पाटोदा गटप्रमुख कैलास घोरपडे, गणप्रमुख दिलीप बोरणारे, बाळासाहेब पिंपरकर, चंद्रभान नाईकवाडे, पिंपरी ग्रामपंचायत सदस्य श्याम गुंड, उपसरपंच अशोक गुंड, धुळगावचे सरपंच योगेश गायकवाड, राजेंद्र गायकवाड, सुभाष गायकवाड, दत्तात्रय गायकवाड, गोरख गायकवाड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com