वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

वीजपुरवठा खंडीत केल्याच्या निषेधार्थ शिवसेनेचे आंदोलन

लासलगाव। वार्ताहर Lasalgaon

शेतकर्‍यांच्या (farmers) कृषिपंपासह ट्रान्सफार्मरचा (Transformer) तोडण्यात येणारा वीजपुरवठा (Power supply) या मागणीसाठी शिवसेनेच्या (shiv sena) वतीने लासलगाव (lasalgaon) येथील वीजवितरण कंपनीचे (Power Distribution Company) उपकार्यकारी अभियंता प्रवीण सोनवणे यांना निवेदन (memorandam) देत वीजवितरण कंपनीच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन (agitation) करून खंडीत केलेला वीजपुरवठा तत्काळ सुरू करण्याची मागणी करण्यात आली.

लासलगाव शिवसेनेच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लासलगाव उपविभागीय कार्यालय अंतर्गत येणार्‍या शेतकर्‍यांच्या कृषीपंपाची (Agricultural pump) अन्यायकारक वीज तोडणी त्वरित थांबवण्यात यावी. सद्यपरिस्थितीत शेतकर्‍यांची आर्थिक परिस्थिती ही करोना (corona) महामारीमुळे अत्यंत हलाखीची आहे. तसेच सतत होणार्‍या अवकाळी पावसामुळे (Untimely rain) शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना जगणे अवघड झाले आहे.

मात्र अशा प्रसंगीच वीजवितरण कंपनी मार्फत संपूर्ण रोहित्र (डीपी) अनधिकृतरित्या बंद करून शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे काम चालविले आहे. सद्यस्थितीत रब्बी पिकांचा हंगाम चालू असल्याने कृषिपंपाची वीज तोडणी केल्याने शेतकर्‍यांवर अन्याय होत आहे. विज मंडल नियामक आयोगाच्या नियमांचे सर्रासपणे वीजवितरण कंपनीकडून उल्लंघन केले जात असून चुकीच्या पद्धतीने रोहित्राचा वीजपुरवठा खडीत करण्याचे काम त्वरीत थांबवावे.

अन्यथा शिवसेनेकडून शेतकर्‍यांसमवेत करण्यात येणार्‍या आंदोलनास सर्वस्वी वीजवितरण कंपनीच जबाबदार धरण्यात येईल असा इशाराही यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. यादरम्यान राज्याचे कृषिमंत्री दादा भुसे (Agriculture Minister Dada Bhuse) यांच्याशी शिवसेना तालुका संघटक तथा पंचायत समितीचे सदस्य शिवा सुरासे, तालुका प्रमुख प्रकाश पाटील यांनी संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली.

ना.भुसे यांनी सध्या रब्बीचा हंगाम (rabbi season) सुरू असल्याने शेतकर्‍यांना पिकांसाठी पाण्याची अत्यंत आवश्यकता असून वीज पुरवठ्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी यांना खंडित करण्यात आलेल्या रोहित्र (डीपी) चा वीजपुरवठा त्वरित जोडण्याचे आदेश दिले. तसेच रोहित्रचा वीजपुरवठा खंडित करण्यापूर्वी संबंधित शेतकर्‍यांना योजनांची माहिती देऊन त्याची पूर्वसूचना द्यावी व विजबिल (Electricity bill) भरण्यासाठी शेतकर्‍यांना मुदत द्यावी असेही आदेश ना.भुसे यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले.

याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब जगताप, तालुका संघटक तथा पं.स. सदस्य शिवा सुरासे, तालुकाप्रमुख प्रकाश पाटील, शहर प्रमुख प्रमोद पाटील, सुनील अब्बड, गणप्रमुख उत्तम वाघ, उपतालुकाप्रमुख विकास रायते, बाळासाहेब शिरसाठ, शिवाजी जाधव, विलास वाघ, निवृत्ती खुळे, राकेश रायते, वसंत शिंदे, किरण शिंदे, तुकाराम रायते, गोकुळ शिंदे, वाल्मीक गांगुर्डे, नारायण वाकळे, अशोक आमले, सचिन कदम, भागवत कुटे, निवृत्ती जगताप आदींसह शिवसैनिक व शेतकरी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.