शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल

शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल

नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांचे प्रतिपादन

वलखेड । वार्ताहर Valkhed-Dindori

‘आगामी नगरपंचायत, जिल्हा परिषद (Zilla Parishad), पंचायत समिती व बाजार समितीसह (Panchayat Samiti and Bazar Samiti) सर्व निवडणुकीत शिवसेनेचा (Shiv Sena) भगवा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे. दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) शिवसेनेची असलेली ताकद पाहता शिवसेना स्वबळावर भगवा फडकवेल’, असे प्रतिपादन शिवसेना नाशिक जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Shiv Sena Nashik District Liaison Officer Bhausaheb Chaudhary) यांनी केले.

दिंडोरी येथे आदिवासी सांस्कृतिक भवनामध्ये शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद दौर्‍यामध्ये चौधरी बोलत होते. भाऊसाहेब चौधरी पुढे म्हणाले की, करोना काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी चांगले काम उभे केले आहे. त्यामुळे करोनाला (Corona) अटकाव घालण्यात यश आले आहे.

देशात मुख्यमंत्र्याच्या कामाची दखल अनेकांनी घेतली आहे. चांगले काम करण्याच्या बाबतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देशात पहिल्या क्रमांकावर आहे. इतर लोकाभिमुख कामे विद्यमान महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारने केली आहेत ती कामे तळागाळातील जनतेसाठी राबवण्यात येणार्‍या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी प्रयत्न करावे.

महाविकास आघाडी सरकार एकोप्याने काम करत करीत आहे. त्यामुळे जिल्ह्यात व राज्यात आगामी होणार्‍या दिंडोरी नगरपंचायत (Dindori Nagar Panchayat), जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका होत आहे. निवडणुका या कार्यकर्ते व संघटनेच्या जोरावर लढवल्या जातात. त्यामुळे शिवसेनेची ताकद पाहता सर्व निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी केली जाईल असे त्यांनी सांगितले. तुम्ही जनतेचे कुठलेही काम आणा आपण आपले मुख्यमंत्री आहेत आपण ते मार्गी लावू.

शिवसेनेचे कार्यकर्ते व संघटन हेच महत्त्वाचे आहे. आपण आपल्या गावात चांगले काम करावयाचे आहे. मुंबई सारखे ग्रामीण भागात महिला संघटना उभी राहिली पाहिजे. चांगले काम करून सेनेला बळकटी द्यावी, पदाधिकारी यांनी पदाचा वापर जनसेवेसाठी करावा असे आवाहन चौधरी यांनी केले. यावेळी जिल्हाप्रमुख सुनील पाटील, माजी आमदार धनराज महाले (Former MLA Dhanraj Mahale), सुरेश डोखळे, उपजिल्हाप्रमुख नाना मोरे, कैलास पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले.

तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी तालुक्यातील समस्या निकृष्ट रस्ते, शेतकर्‍यांचे वीज कनेक्शन कट करू नये, जमिनीचे लिलाव व कर्ज वसुली थांबवावी, स्थानिकांना रोजगार मिळावा आदी समस्या याठिकाणी मांडल्या. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन डॉ. विलास देशमुख यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख पांडुरंग गणोरे यांनी मानले. याप्रसंगी युवासेनेचे जिल्हाधिकारी नदिम सय्यद, शिवसेना उपतालुका प्रमुख रावसाहेब जाधव, विलास केदार,

तानाजी गावित, प्रभाकर जाधव, जनार्दन वाघ, विजय पिंगळ, जयराम डोखळे, अविनाश वाघ, जिल्हा समन्वय संगम देशमुख, किरण कावळे, निलेश शिंदे, नारायण राजगुरु, विश्वास गोजरे, अरुण गायकवाड, संतोष मुरकुटे, अशोक निकम, सोनू देशमुख, वसंत घडवजे, सोमनाथ निंबेकर, शाम वाघमारे, अमोल कदम, जगन सताळे, पप्पू शिवले, अवी खान, गणेश हिरे, ज्ञानेश्वर शिंदे, बाळू निसाळ महिला आघाडी अस्मिता जोंधळे, चुंबळे, उज्वला बोराडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com