मनपा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज : बागूल

कोकणे, बेलदार, गायधनी, बर्वे यांचा सत्कार
मनपा निवडणुकीसाठी शिवसेना सज्ज : बागूल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

महापालिकेसह ( Municiapal Corporation ) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ( Local Body Elections ) शिवसेनेची ( Shivsena )पूर्ण तयारी झाली असून, त्यासाठी शिवसैनिक सज्ज असल्याचेे प्रतिपादन शिवसेना उपनेते सुनील बागूल ( Sunil Bagul- Shivsena )यांनी केले.

बाळासाहेब कोकणे (मध्य नाशिक), योगेश बेलदार (पूर्व नाशिक) तर सुभाष गायधनी यांची (पश्चिम नाशिक) शिवसेना विधानसभा प्रमुखपदी आणि गणेश बर्वे यांची सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सदस्यपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा शालिमार येथील पक्ष कार्यालयात सुनिल बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बागूल बोलत होते.

आपली खरी लढत भाजपशी आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी कोकणे, बेलदार आणि गायधनी यांची जबाबदारी वाढली असून, त्यांनी संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देऊन शिवसेनेचे विचार आणि महाविकास आघाडीने घेतलेले लोकाभिमुख निर्णय आमजनतेपर्यंत पोहोचवावेत, असे जिल्हाप्रमुख विजय करंजकर म्हणाले.

महानगरात शिवसेनेची बूथ यंत्रणा सक्षम झाली असून, यावेळी 100 प्लसचे स्वप्न साकार होणारच असा विश्वास महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी व्यक्त केला. या वेळी व्यासपिठावर माजी महानगरप्रमुख महेश बडवे शोभा मगर मंदा दातीर, मंगला भास्कर, शोभा गटकळ, प्रेमलता जुन्नरे, जगन आगळे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com