नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

देशभरात लाॅकडाऊननंतर २० हून अधिक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती ९३ रुपयांवर तर डिझेल दरवाढ ८० रुपयांवर पोहोचली. घरगुती गॅस सिलिंडरच्या दरही दिवसेंदिवस वाढत आहे.

इंधन दरवाढीचा भडकाल्या केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप करत शिवसेनेने रस्त्यावर उतरत शालिमार येथे जोरदार आंदोलन केले. यावेळी केंद्रातील भाजप सरकारविरुध्द जोरदार घोषणबाजी केली.

इंधन दराचा भडका उडवत सर्वसामान्याच्या लुटी विरोधात शनिवारी (दि.१२) शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत जोरदार आंदोलन केले. रद्द करा रद्द करा इंधन दरवाढ रद्द करा, केंद्र सरकारचा गैरकारभार पेट्रोल डिझेल दरवाढीचा जनतेवर भार, देशाचे राष्ट्र द्रोही कोण आहे रावसाहेब दानवे चोर आहे, शेतकरी सकल जगाचा अन्नदाता तोच आहे खरा देशाचा भाग्यविधाता, पेट्रोल डिझेल दरवाढीविरोधात केंद्र सरकारचा जाहीर निषेध जाहीर निषेध जाहीर निषेध, रावसाहेब दानवे चे करायचं काय खाली डोकं वर पाय, महागाईचा भडका केंद्र सरकारला द्या तडका, उठा उठा महागाई आली मोदी सरकार जाण्याची वेळ झाली अशा जोरदार घोषणाबाजीने शालिमार परिसर दणाणून सोडला.

यावेळी खा. हेमंत गोडसे, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे स्थायी समीती सदस्य सुधाकर बडगुजर सत्यभामाताई गाडेकर यांसह मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.