शिवसेना म्हणजे शिवसैनिकांचा श्वास : घोलप

पक्षाच्या वर्धापनदिनानिमित्त 56 किलो लाडूंचे वाटप
शिवसेना म्हणजे शिवसैनिकांचा श्वास : घोलप

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

शिवसेना (shiv sena) हा केवळ पक्ष नसून शिवसैनिकांचा मंत्र, ध्यास, आत्मविश्वास आणि श्वास असल्याचेे प्रतिपादन शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप (Former Minister Babanrao Gholap) यांनी केले.

शिवसेनेचा (shiv sena) 56 वा वर्धापनदिन (Anniversary) नाशिक महानगर आणि जिल्ह्यात विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. शालिमार येथील मध्यवर्ती कार्यालयात यानिमित्त 56 किलो लाडूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी शिवसैनिक (shiv sainik) आणि उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करतांना घोलप बोलत होते. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.

महाराष्ट्रात भूमिपुत्रांच्या न्याय्य व हक्कांसाठी व त्यांचा आवाज बुलंद करण्याकरिता बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची मुहूर्तमेढ रोवली.19 जून 1966 ला हा पक्ष अस्तित्वात आला. पुढे बाळासाहेब ठाकरे यांना हिंदुहृदयसम्राट ही उपाधी मिळाल्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. पक्षाच्या वाटचालीचा आढावा घेताना शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण (politics) करते. विविध उपक्रम राबवून शिवसैनिक तळागाळातील लोकांची सेवा करतात.

त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करते. गेल्या 56 वर्षांत शिवसेनेने यशाचे मोठे शिखर गाठले आहे.आज राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनाप्रणित महाविकास आघाडीचे सत्कार सत्तेवर असून या सरकारची कामगिरीही दमदार आहे.राज्यातील आगामी महापालिका तसेच जिल्हापरिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीत सर्वत्र एकहाती शिवसेनेचा भगवा फडकविण्याचा संकल्प सर्व शिवसैनिकांनी केला तरच वर्धापनदिन साजरा केल्यासारखे होईल, असे मान्यवरांनी सांगितले. यावेळी उपनेते सुनील बागूल, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी खा.हेमंत गोडसे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, माजी गटनेते विलास शिंदे, युवासेना जिल्हाधिकारी राहुल ताजनपूरे, भा.वि.से.जिल्हा संघटक वैभव ठाकरे, शिवसेना विधानसभा प्रमुख नीलेश कोकणे, योगेश बेलदार, सुभाष गायधनी, महिला आघाडी संपर्क वि.स.संघटक संगीता खोडाना, महिला पदाधिकारी मंगला भास्कर, मंदा दातीर, शोभा मगर, शोभा गटकळ नगरसेवक राहुल दिवे, संतोष गायकवाड, प्रविण तिदमे, चंद्रकांत खाडे, मधुकर जाधव, संगीता जाधव राधा बेंडकोळी आदींसह शिवसेनेच्या अंगीकृत संघटना, महिला पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्याने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com