
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
शिवसेनेने (Shivsena) युवा वर्गाचे महत्त्व ओळखून युवासेनेच्या (Yuvasena) माध्यमातून अनेक उपक्रम राबविले. त्यामुळे अगदी सामान्य कुटुंबातील मुलांनाही कर्तृत्व दाखविण्याची संधी मिळाली. युवती सेनेच्या माध्यमातून अनेक युवतीसुद्धा आपल्या कार्याची चुणूक दाखवित आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात युवती सेना पोहोचली आहे, असे प्रतिपादन युवा सेना कार्यकारणी सदस्य शितल देवरुखकर (Shital Devrukhkar) यांनी केले...
युवासेना, युवती सेनेच्या बैठकीत त्यांनी मार्गदर्शन केले. युवासेना प्रमुख, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांच्या प्रेरणेतून पक्षबांधणी केली जात आहे. जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी (Bhausaheb Chaudhary) यांनी जिल्ह्यात राबविलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
व्यासपीठावर माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, चांदवड-देवळा विधानसभा संपर्कप्रमुख ललित शाहीवाले, नाशिक लोकसभा युवासेना विस्तारक सिद्धेश शिंदे, दिंडोरी लोकसभा विस्तारक नीलेश गवळी, युवा जिल्हाधिकारी राहुल ताजनपुरे, महिला आघाडीच्या मंगला भास्कर उपस्थित होते.
यावेळी डिंपल भोईर, गायत्री पेलमहाले, प्रियंका धात्रक, मनीषा गायधनी यांच्यासह युवती सेनेच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
प्रास्ताविक युवती सेना उपजिल्हाधिकारी नगरसेविका हर्षदा गायकर यांनी केले. सूत्रसंचालन युवा जिल्हाधिकारी नगरसेवक दीपक दातीर यांनी केले. आभार युवती सेना उपजिल्हाधिकारी नगरसेविका किरण गामणे यांनी मानले.
बैठकीस नगरसेवक सुनील गोडसे, योगेश बेलदार, गणेश बर्वे, गोविंद कांकरीया, प्रवीण चव्हाण, योगीता गायकवाड, स्नेहला देशमुख, वैभवी सुलक्षणे, पूजा गायकवाड राजश्री चौधरी, उज्ज्वला बोराडे आदी उपस्थित होते.